Bakrid 2023 : ‘या’ तारखेला साजरी होणार ‘बकरी ईद’, समितीने केली घोषणा?

| Updated on: Jun 19, 2023 | 10:19 PM

यावर्षी बकरी ईद किती तारखेला येणार याची उत्सुकता लागली होती. 28 जून आणि 29 अशा दोन तारखेला बकरी ईद येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता बकरी ईद कोणत्या दिवशी साजरी करण्यात येणार याची तारीख समोर आली आहे.

Bakrid 2023 : या तारखेला साजरी होणार बकरी ईद, समितीने केली घोषणा?
BAKRI ID
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : मुस्लिम बांधवांचा ईद-उल-अधा (Eid al-Adha), ज्याला “बलिदानाचा सण” किंवा बकरी ईद म्हणूनही ओळखले जाते. जगभरात साजरा केला जाणारा हा सर्वात महत्वाचा सण. मक्का शहराच्या हज यात्रेच्या वार्षिक समाप्ती या दिवशी होते. बकरी ईद इस्लामिक चंद्र दिनदर्शिकेतील बाराव्या महिन्याच्या धु अल-हिज्जाच्या दहाव्या दिवशी येते आणि ती चार दिवस असते. यावर्षी बकरी ईद किती तारखेला येणार याची उत्सुकता लागली होती. 28 जून आणि 29 अशा दोन तारखेला बकरी ईद येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता बकरी ईद कोणत्या दिवशी साजरी करण्यात येणार याची तारीख समोर आली आहे.

यंदा प्रथमच राज्यात कार्तिकी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे मुस्लिम बांधवानी स्वागत केले. त्यापाठोपाठ आता बकरी ईदची तारीखही समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

मस्जिद-ए-नाखोदा मरकझी रुयत-ए-हिलाल समिती ( MASJID-E-NAKHODA MARKAZI ROOYAT-E-HILAL COMMITTEE ) यांनी बकरी ईदच्या तारखेची घोषणा केली आहे. गुरुदावर दिनांक 29 जून 2023 रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे.

मस्जिद ए नाखोडा मरकजी रुयत- ए – हिलाल समितीने ईद-उल-अझा चा चंद्र 1444 दिसला. त्यामुळे “ईद उल अजहा” (EID UL AZHA) 29 जून 2023 रोजी साजरा केला जाईल असे जाहीर केले आहे