कारचा अपघात, गाडीत कोट्यवधींची कॅश पण शेवटला वेगळंच सत्य समोर

| Updated on: Jun 20, 2024 | 6:15 PM

चित्रपटामध्ये कारचा अपघात झाल्यावर त्या गाडीत पैसे सापडल्यावर त्यावेळची परिस्थिती कशी असते पाहिलं असावं. अशातच अकोल्यामध्ये असाच काहीसा प्रकार घडला मात्र शेवटला वेगळंच सत्य समोर आलं.

कारचा अपघात, गाडीत कोट्यवधींची कॅश पण शेवटला वेगळंच सत्य समोर
Follow us on

अकोल्यामधील बाळापूर तालुक्यात खामगावकडे जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला होता. मात्र हा अपघात झाल्यानंतर एखाद्या चित्रपटासारखा थरार पाहायला मिळाला. चारचाकी गाडीचा अपघात झाल्यावर त्या गाडीमध्ये कोट्यवधी रूपयांची कॅश असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. महामार्गावर मोठी गर्दी झाली मात्र काही वेळात पोलीस दाखल झाले. त्यानंतर ती कार पोलिसांनी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आणली. पण गाडीमध्ये सापडलेल्या पाचशेच्या सर्व नोटा खोट्या असल्याचं समोर आलं.

अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यात खामगावहून अकोल्याकडे जाणाऱ्या कारचा आणि बाईक चा अपघात झाला होता. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास झाला. कारमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोटा असत्याची बाब समोर आली आली आणि या अपघात कारची तपासणी केली असता कारमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन आरोपीसह कार नोटा आणि एक यंत्र ताब्यात घेतलं. चौकशी आणि तपास केल्यावर कारमधील नोटा या नकली असल्याच समोर आलं.

बाळापूर पोलिसांनी कारमधील अटक करण्यात आलेल्यांची चौकशी करत आहे. गाडीमधील 500 च्या नकली नोटा घेऊन हे व्यक्ती कुठे जात होते. यांच्याकडे पैसे मोजण्याची मशीन ही आढळून आली आहे. त्यामुळे हे व्यक्ती नकली नोटा आणि मशीनचे काय करत होते.