बाळू मामांच्या मेंढयांचा कळप चिरडला, भरधाव कार आली ब्रेक मारला पण तरीही…

| Updated on: Feb 12, 2023 | 3:58 PM

बाळू मामांच्या मेंढया सध्या सिन्नर परिसरात फिरत आहे. दुसऱ्या शेतात सायंकाळच्या वेळी जात असतांना हा अपघात घडला आहे.

बाळू मामांच्या मेंढयांचा कळप चिरडला, भरधाव कार आली ब्रेक मारला पण तरीही...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर  ( Nashik Sinnar News )  येथे एका भरधाव कारने मेंढयांचा ( sheep ) कळप चिरडल्याची घटना घडली आहे. बाळू मामांच्या मेंढयांचा हा कळप होता त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 12 ते 15 मेंढयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सिन्नर येथील पंचाळे गावच्या शिवारात शहा पंचाळे रस्त्याने बाळू मामाची मेंढयांचा कळप स्विफ्ट कारने उडवल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागातील सिन्नर परिसरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बाळू मामांच्या तेरा नंबरच्या पालखीचा मुक्कामही सध्या याच भागात होता. त्याच दरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे.

जवळपास अडीचशे मेंढयांच्या कळपातच भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट कार शिरल्याने 10 ते 15 मेंढयांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय आणखी काही मेंढया गंभीर जखमी झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

बाळू मामांच्या मेंढया सध्या सिन्नर परिसरात फिरत आहे. दुसऱ्या शेतात सायंकाळच्या वेळी जात असतांना हा अपघात घडला आहे. शहा बाजूकडून पंचाळेच्या बाजूला जात असतांना हा अपघात झाला आहे.

बाळूमामाच्या मेंढयांचा हा आपघात इतका भीषण होता की काही मेंढयांचा जागेवर मृत्यू झाला आहे. तर आणखी काही मेंढया जखमी असल्याने त्यांच्यावर पैशू वैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून उपचार सुरू आहे.

याच सिन्नर तालुक्यात आता बाळू मामाच्या मेंढयांचा काही दिवस मुक्काम आहे. यामध्ये दुसरी एक बाब म्हणजे सिन्नर परीसरात वारंवार अपघात होत असल्याने कारवाईची मागणी केली जात आहे.

गावातील पोलिस पाटील शांताराम कोकाटे यांच्यासह पोलीस हवालदार यांनी यावेळी मदत केली असून गावकऱ्यांनी धरणे आंदोलन देखील केले आहे. त्यामुळे एकूणच गावकऱ्यांच्या मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिन्नर परिसरात अपघातच्या घटना सातत्याने घडत आहे. मागे काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका खाजगी बस आणि ट्रकचा अपघात झाला होता यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता, चार ते पाच जणांचा मृत्यू झाला होता तर दुसरीकडे अनेक जणं गंभीर जखमी झाले होते.

मुंबईसह इतर ठिकाणाहून अनेक प्रवासी शिर्डीला साई बाबांच्या दर्शनासाठी जात असतात. त्याच दरम्यान अनेक अपघात झाल्याचे समोर आले असून यानिमित्ताने पुन्हा ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.