बहुजन समाजाच्या नेत्याला संपवण्याचे षडयंत्र; संजय राठोडांना गोवलं जातंय, बंजारा धर्मगुरुंची विनंती

| Updated on: Feb 15, 2021 | 12:55 PM

पोहरादेवी येथे नुकताच संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महंत जितेंद्र महाराज आणि महंत सुनील महाराज यांनी संजय राठोड यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. | Banjara Sanjay Rathod

बहुजन समाजाच्या नेत्याला संपवण्याचे षडयंत्र; संजय राठोडांना गोवलं जातंय, बंजारा धर्मगुरुंची विनंती
संजय राठोड
Follow us on

वाशिम: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan) संजय राठोड यांना जाणुनबुजून गोवले जात आहे. या माध्यमातून बहुजन समाजातील आणखी एक नेतृत्त्व संपवण्याचा डाव असल्याचा आरोप बंजारा समाजाच्या धर्मगुरुंकडून करण्यात आला. त्यामुळे आता बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहत असल्याचे चित्र आहे. (Banjara community backs Sanjay Rathod)

पोहरादेवी येथे नुकताच संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महंत जितेंद्र महाराज आणि महंत सुनील महाराज यांनी संजय राठोड यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. पूजा चव्हाण ही बंजारा समाजातील होतकरु मुलगी होती. तिने आत्महत्या केल्याने समाजाची न भरुन येणारी हानी झाली आहे. आता या प्रकरणात बहुजनांचे नेते संजय राठोड यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यापूर्वी एकनाथ खडसे आणि धनंजय मुंडे यांच्यावरही असे आरोप झाले. या माध्यमातून राज्यातील बहुजन नेतृत्व संपविण्याचे कारस्थान आखले जात असल्याचा आरोप महंत सुनील महाराज यांनी केला.

पूजा चव्हाण हिने कर्जाच्या तणावातून आत्महत्या केली, हे तिच्या वडिलांनी सांगितले आहे. त्यामुळे आता बंजारा समाजाची बदनामी थांबवली जावी, अशी आमची शासनाला विनंती असल्याचेही महंतांनी सांगितले.

यवतमाळमध्ये बंजारा समाजाची बैठक

काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये बंजारा समन्वय समितीची बैठक पार पडली होती. त्यावेळी बंजारा नेत्यांनी संजय राठोड यांच्या पाठिशी उभा राहण्याचा निर्णय घेतला होता. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan suicide case) भाजपच्या नेत्यांनी रान उठवल्यामुळे शिवसेनेचे मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड अडचणीत आले होते. मात्र, आता बंजारा समाज त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावला आहे. न्यायनिवाडा न करताच समाजातील नेत्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र आमचा समाज खपवून घेणार नाही, असा इशारा बंजारा नेत्यांकडून देण्यात आला.

(Banjara community backs Sanjay Rathod)