मनात आहे ते प्रत्यक्षात का उतरवत नाही; औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि मनसेत जुंपली

| Updated on: Dec 24, 2020 | 6:02 PM

औरंगाबाद शहराचे (Aurangabad City) नाव 26 जानेवारीपर्यंत छत्रपती संभाजीनगर करा नाहीतर उत्तर देऊ, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. | aurangabad city

मनात आहे ते प्रत्यक्षात का उतरवत नाही; औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि मनसेत जुंपली
Follow us on

औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याच्या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली आहे. शहरातल्या चौकांमध्ये बॅनर लावून औरंगाबाद शहराचे (Aurangabad City) नाव 26 जानेवारीपर्यंत छत्रपती संभाजीनगर करा नाहीतर उत्तर देऊ, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. मनसेने दिलेल्या या इशाऱ्यामुळे औरंगाबादमधील राजकारण तापले आहे. (Rename Aurangabad To Sambhajinagar demand by MNS)

औरंगाबादचे संभाजीनगर या वादावरून कालपर्यंत एमआयएम आणि शिवसेनेने आपली राजकीय पोळी भाजली त्यांची पोळी चांगली भाजल्याचं पाहून आता मनसेच्याही मनामध्ये उमाळे दाटून येऊ लागले आहेत. त्यामुळे या वादामध्ये आता मनसेने उडी घेतली आहे मात्र येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये या हाच मुद्दा हातात घेतल्यामुळे मनसेला किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसेच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असा धमकीवजा बोर्ड लावल्यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर हे आमच्या हृदयात आहे. आम्ही मनसेच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

‘तुमच्या मनात आहे ते प्रत्यक्षात का उतरत नाही?’

अनिल परब यांच्या टीकेलाही मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर जर तुमच्या मनात आहे तर ते प्रत्यक्षात का उतरवत नाही. आता तर तुमचा थेट मुख्यमंत्रीच आहे. त्यामुळे शहराचं नाव बदला. जेणेकरून औरंगाबादच्या जनतेला आनंद होईल. मात्र तुमच्याकडून सातत्याने औरंगाबादकरांची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसेने केला.

भाजपची भूमिका काय?

कोरोना संकटापूर्वी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी भाजपने शहराच्या नामांतरचा मुद्दा उचलून धरला होता. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचे अनेक दौरेही केले होते.

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल असून त्याला गती देऊन शहराचे नाव बदललेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर, चंद्रकांत खैरेंची माहिती

औरंगाबादचे सुपर संभाजीनगर करणार, सुभाष देसाईंचं वक्तव्य

… तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील

(Rename Aurangabad To Sambhajinagar demand by MNS)