अंतरवाली : मुंबईमध्ये जावून मराठा आरक्षणाचा अध्यादेश मिळवल्यानंतरही मनोज जरांगे (Manoj Jarange) काही गोष्टींसाठी अद्यापही आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सभागृहात कायदा पारित करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगे सातत्यानं करत आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आणि मागच्या दारातून मराठ्यांना आरक्षण दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ करत आहे. संभ्रम आणि विसंगत व्यक्तव्य करू नये असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला कायद्यात रूपांतर करण्यासाठी आणि काही आवश्यक सुचनांचे स्वागत केले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा पारित करण्यासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. तसेच अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे म्हणून 10 तारखेला आमरण उपोषणाला देखील ते बसणार असल्याचे जाहिर केले आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जरांगे यांनी खडसावले. आव्हान देने हा त्यांचा धंदा आहे, मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी ते करतात. आमच्या अन्नात माती कालवली तर 27 टक्के आरक्षणाला आम्ही चॅलेंज करणार आहोत असंही जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना तुरूंगात जाण्याची भिती आहे म्हणून ते ओबीसी बांधवांची दिशाभुल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाचा लढा शांततेत सुरू आहे. मराठा शांततेत मुंबईत गेले आणि परत आले. या ऐवजी दुसरा समाज असता तर मुंबईत धिंगाणे झाले असते असेही जरांगे म्हणाले.