बीड | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi) यांचा आज वाढ दिवस आहे. यानिमित्ताने बीड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज उपहासात्मक आंदोलन केलं आहे. आज एक एप्रिल (First April) म्हणजे एप्रिल फुलच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्यामुळे अवघ्या देशातील जनतेची फसवणूक पंतप्रधानांनी चालवली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. बीडममधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (Beed Agitation) एकत्र येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सध्याच्या महागाईला जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा देशातील जनतेसाठी मोठा एप्रिल फुल आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. बीडमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यानिमित्त केकही कापला. त्यानंतर तो केक या कार्यकर्त्यांनी आपापसात वाटून खाल्ला.
या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, ‘ या लबाड माणसाचा वाढदिवस आम्ही एप्रिल फुलचे औचित्य साधून करत आहोत. पंतप्रधान साहेबांनी युवकांची फसवणूक , जनतेची, महिलांची फसवणूक केली आहे. हा एकपात्री अभिनय करून दिशाभूल करून ते आज सत्तेवरती आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याच उद्देशाने आम्ही बीड जिल्ह्यात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत.
इतर बातम्या-