Beed | फडणवीसांवर टीका करणाऱ्या मिटकरींनी राजकारण सोडून चित्रपटात जावं, भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींचा सल्ला

| Updated on: Apr 15, 2022 | 10:52 AM

डॉ. बाबासाहेब आंबंडेकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपादरम्यान आरोप-प्रत्यारोप झालेले पहायला मिळतायत. आज भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी अमोल मिटकरींवर खोचक टीका केली.

Beed | फडणवीसांवर टीका करणाऱ्या मिटकरींनी राजकारण सोडून चित्रपटात जावं, भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींचा सल्ला
भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांची राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर टीका
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बीड| महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केल्यानंतर पवार साहेब आपल्याला मोठं करतील. या महत्त्वाकांक्षेपोटी अनेक मंडळी फडणवीसांवर उठसूठ टीका करतात. अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे त्यापैकीच एक असून त्यांनी खरं तर राजकारण सोडून चित्रपटातच जावं, असा सल्ला भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीटद्वारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. फडणवीस यांनी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलेल्या 14 ट्वीटला उत्तर देताना फडणवीसांचे बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे हे वरवरचे सोंग आहे, एकिकडे संविधान व जयभीम म्हणायचे आणि आतून मनुस्मृतीचा अजेंडा राबवण्याचे षडयंत्र रचायचे, असे प्रकार असल्याची टीका अमोल मिटरकरी यांनी काल ट्वीटरवरून केली होती. त्याला भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले राम कुलकर्णी?

डॉ. बाबासाहेब आंबंडेकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपादरम्यान आरोप-प्रत्यारोप झालेले पहायला मिळतायत. आज भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी अमोल मिटकरींवर खोचक टीका केली. ते म्हणाले ,’ महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर पवार साहेब आपल्याला मोठं करतील. या महत्वकांक्षे पोटी काही मंडळी उठसुठ टीका करत आहेत. अमोल मिटकरी हे त्यांपैकीच एक असून स्वःतला ते फार वैचारिक समजतात. मिटकरी हे चुकून राजकारणात आले आहेत. कारण ते कधी लावणी म्हणतात, तर टीका करताना अभिनय करतात . त्यांनी राजकारण सोडून चित्रपटात जावं असा सल्ला भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिला आहे.

मिटकरींची फडणवीसांवर टीका

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट्स केले. यात त्यांनी महाविकास आघाडीवर आरोप केले. सरकारने अनेक चांगल्या योजना बंद केल्या. आता भारनियमन सुरु केले. जो शब्द महाराष्ट्राच्या विस्मरणात गेला होता, तो पुन्हा लादला जातोय. आदी आरोप फडणवीसांनी केले होते. त्यावर अमोल मिटकरी यांनी ट्वीटद्वारेच प्रत्युत्तर दिले. सत्तेत नसल्याने काही कामधंदा उरला नसल्यामुळे विरोधी पक्षनेत्याने 14 एप्रिलचे निमित्त साधून जे 14 ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसवर केले, त्यात फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष दिसून येतो. मुस्लीम द्वेष्टे आहात तर शहानवाज हुसेन व मुक्तार अब्बास नकवी यांच्याबद्दल बोला, अशी टीका मिटकरी यांनी केली होती.

इतर बातम्या

MNS Banner : शिवसेना मनसेचं पोस्टर वॉर कायम, मनसेने लावलेलं बॅनर पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune MNS Vs NCP : मनसेच्या हनुमान चालिसाला राष्ट्रवादीचे जशास तसे उत्तर; हनुमान मंदिरात करणार इफ्तार पार्टी!