बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे त्यांच्या भाषण शैली बरोबरच फिटनेसमुळे (Fitness) देखील नेहमीच चर्चेत असतात. आता आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळातून विश्रांती मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. परळीतील (Parali Munde) एका जिम मध्ये त्यांचा वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. कॉलेजमधील तरुण धनंजय मुंडेंच्या या व्हिडिओवर असंख्य प्रतिक्रिया देत आहेत. सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून राजकीय नेत्यांच्या प्रत्येक हालचालींवर जनतेचं लक्ष आहे. त्यातच बीडमधील मुंडे घराण्यातील व्यक्तींच्या प्रत्येक गोष्टीवर सोशल मीडियातून प्रतिक्रियांचा पाऊस होत असतो. आता धनंजय मुंडेंनी टाकलेला फिटनेसचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय…
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकारण सर्वश्रुत आहे. दोघांमधील राजकीय मुद्द्यांवरील बेबनाव अनेकदा लोकांच्या चर्चेचा विषय होतो. भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेमातून झालेले संवादही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बीड आणि मराठवाड्यात तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांची नेहमी चर्चा होत असते. आता अशातच त्यांच्या या व्हिडिओ मुळे धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत आलेत. परळी मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करत या धावपळीतून वेळ काढत त्यांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष दिले आहे.
Video : धनंजय मुंडेंचा फिटनेसचा व्हिडीओ बघावाच लागतोय… pic.twitter.com/3zh9uZjeu6
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 11, 2022
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी काल धनंजय मुंडे यांनी केली होती. जाहीर झालेल्या 92 नगर परिषदेच्या निवडणुका आरक्षण झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी ठाम भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली. मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातदेखील ओबीसींचं राजकीय आरक्षण अबाधित रहावं. तसंच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.