बीडमध्ये बिबट्याची दहशत, आठ दिवसात तिघांचा मृत्यू, 6 जण जखमी

| Updated on: Dec 04, 2020 | 12:17 PM

बिबट्याला पकडण्यासाठी सात जिल्ह्यातून स्पेशल पथक तैनात करण्यात आले आहेत. मात्र, बिबट्याला जेरबंद करण्यात अद्याप पथकाला यश आलेलं नाही

बीडमध्ये बिबट्याची दहशत, आठ दिवसात तिघांचा मृत्यू, 6 जण जखमी
Follow us on

बीड : बीडमध्ये गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा शेतकऱ्यांवर हल्ला सुरुच आहे (Beed Leopard Attack). बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी सोलेवाडी येथील विकास झगडे या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात दिवसेंदिवस दहशत वाढतच चालली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी सात जिल्ह्यातून स्पेशल पथक तैनात करण्यात आले आहेत. मात्र, बिबट्याला जेरबंद करण्यात अद्याप पथकाला यश आलेलं नाही (Beed Leopard Attack).

पाटोदा तालुक्यातील सुरडी गावात शेतकरी नागनाथ गर्जे हे दारे धरण्यासाठी शेतात गेले होते. तेव्हा बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला चढविला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी बिबट्याने पुन्हा किन्ही गावातील शेतात आजी-आजेबासोबत गेलेल्या दहा वर्षीय स्वराज भापकर या मुलावर हल्ला. केला यात त्याचाही जागीच मृत्यू झाला. तिसऱ्या दिवशी पुन्हा बिबट्याने हल्ला केला, यात तीन जण जखमी झाले होते.

बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी शेतात जाणं बंद केले आहे. सध्या कापूस वेचणीला आला आहे. अशात बिबट्याची दहशत वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही घटना ताजी असतानाच बिबट्याने पुन्हा आष्टी तालुक्यातील पारगाव येथील सुरेखा बळे या महिलेवर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आठ दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांच्या मृत्यू आणि 6 जण जखमी झाले आहेत. काल सोलेवाडी येथील विकास झगडे हे शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत (Beed Leopard Attack).

नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी शासनाकडे मागणी केल्यानंतर सात जिल्ह्यातील 16 पथकं बीड जिल्ह्यातील आष्टी आणि पाटोदा परिसरात पाठविण्यात आले. स्पेशल पथकाने प्रयत्नाची शिकस्त केली. मात्र, अद्याप बिबट्याला पकडण्यात यश आले नाही. स्पेशल पथकासोबत सुरेश धस यांनी देखील अनेक रात्री बिबट्याच्या शोध कार्यात घातले आहे. बिबट्याचा हैदोस पाहून परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. कोणत्याही परिस्थितीत बिबट्याला पकडून जेरबंद करावं, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र अनभिज्ञ

आठ दिवसापासून बिबट्याने आष्टी आणि पाटोदा तालुक्यात दहशत माजविली असताना तालुका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना धीर देण्यास कमी पडले आहेत. आमदार बाळासाहेब आजबे यांनी प्रशासनाला कसल्याच सूचना केल्या नसल्याने मतदारसंघातून अजब व्यक्त केला जातो आहे.

Beed Leopard Attack

संबंधित बातम्या :

चार वर्षाची भाची बिबट्याच्या जबड्यात; जीवाची बाजी लावून मामाने वाचले प्राण

नरभक्षक बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश, पाथर्डीकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

बिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, 10 दिवसातील दुसरी घटना