बीड : (Vinayak Mete) शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. मुंबईतून त्यांचे पार्थीव आता बीडकडे रवाना झाले असून सोमवारी (Beed) बीड येथील उत्तम नगरातील त्यांच्या शेतामध्ये पार्थिवावर (Extreme rites) अत्यंसंस्कार होणार आहेत. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने उद्या 15 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात येणार असून सर्व व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मेटे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी आणि बीड शहर अध्यक्ष विनोद पिंगळे व इतर पदाधिकार्यांनी केले आहे.
सोमवारी दुपारी 3.30 वाजता बीड येथील जालना रोडवरील उत्तम नगरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील सिध्दीविनायक पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्य यात्रेदरम्यान अंत्यदर्शन घेता येणार नाही.त्यामुळे शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता अंत्ययात्रेला सुरूवात होणार आहे. शिवसंग्राम भवन – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक- कारंजा चौक – बलभीम चौक – माळवेस चौक – सुभाष रोड – अण्णाभाऊ साठे चौक – शाहूनगर – अंबिका चौक – अंत्यविधी स्थळ. यादरम्यान अंत्ययात्रा मार्ग असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.
अंत्यसंस्कार हे शासकीय इतमात होणार असल्याने नातेवाईकाव्यतिरिक्त इतर कोणालाही अंत्य यात्रेदरम्यान अंत्यदर्शन घेता येणार नाही. त्यामुळे शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसंग्राम भवन येथेच नागरिकांनी साहेबांचे अंतिम दर्शन घ्यावे असे आवाहन शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी केले आहे. बीड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनायक मेटे यांचे संबंध अधिक जवळचे होते. शिवाय मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे यांनी वेळोवेळी आवाज उठविलेला आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांचे अपघाती निधन झाले आहे. सोमवारी दुपारी 4 च्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी राज्य भरातून शिवसंग्रामचे
कार्यकर्ते तर दाखल होतीलच पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत.