बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. सध्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. त्यातच अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याप्रकरणी वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहेत. त्यातच आता वाल्मिक कराड प्रकरण गृहमंत्री अमित शाह यांच्या कोर्टात जाणार आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनावणे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यांनी अमित शाहांकडे भेटासाठीची वेळ मागितली आहे. मात्र ती मिळत नाही. त्यामुळे वाल्मिक कराड नाव जबाबात कुटुंबाने घेतलं आहे. मात्र तरीही गुन्हा दाखल होत नाही, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनावणे हे लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. बजरंग सोनावणे यांनी अमित शाह यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. मात्र ती मिळत नसल्याने बजरंग सोनावणे यांनी अद्याप अमित शाहांची भेट घेतली नाही. याबद्दल बजरंग सोनावणे हे लवकरच अमित शाहांची भेट घेऊन संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड प्रकरणाबद्दल चर्चा करण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबाने वाल्मिक कराड यांचे नाव जबाबात घेतले आहे. मात्र तरीही अद्याप वाल्मिक करडावर हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्यासोबच मला देशमुख कुटुंबाने सांगितले की अनिल गुजर नावाच्या अधिकाऱ्याला का ठेवलं आहे? सगळे अधिकारी बदलले मग त्याच अधिकाऱ्याला का ठेवलं? तो अधिकारी कुटुंबाला सांगतो कोणकडे जायचं तिकडे जा? तपास मीच करणार आहे. माझ्याशी देशमुख कुटुंबातील सदस्य बोलले, असे अनेक सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केले.
आज कराडला जामीन मिळणार नाही. त्याची प्रकरण बाहेर येत आहेत. वाल्मिक कराडच नाव कुटुंबाने जबाबात सांगितले आहे, असा खुलासाही बजरंग सोनवणे यांनी केला.