बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यांच्या हत्येनंतर राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या हत्येप्रकरणी आतापर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्व आरोप पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडेच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही अटक केली. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप आहे. या प्रकरणी सरकारने SIT चौकशी नेमली आहे. त्यावरुन शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी बीड हत्या प्रकरणाच्या तपासावरुन काही सवाल उपस्थित केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मधे हे महेश विघ्ने कसे? तसेच मनोजकुमार वाघ याच्याबद्दलही जितेंद्र आव्हाड यांनी सवाल केला आहे. त्यांनी या दोघांचे फोटोही पोस्ट केले आहेत.
“संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडनुक काळात धंनंजय मुंडे चा कार्यकर्ता आसल्या प्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराड चा आत्यंत खास माणुस आसुन गेले १० वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील… pic.twitter.com/5BThMPUvng
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2025
दरम्यान बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोप सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या सिद्धार्थ सोनावणे आणि डॉ. संभाजी वायभसे यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुखांना न्याय मिळावा, यासाठी बीड, परभणी आणि पुण्यात सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला. यावेळी संतोष देशमुखांना न्याय द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.