प्राजक्ता माळीने माफी मागायला सांगताच सुरेश धस कडाडले, म्हणाले “जे होईल त्याला…”

| Updated on: Dec 30, 2024 | 2:42 PM

प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली होती. आता आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या मागणीवर एका वाक्यात उत्तर दिले आहे.

प्राजक्ता माळीने माफी मागायला सांगताच सुरेश धस कडाडले, म्हणाले जे होईल त्याला...
prajakta mali suresh dhas (1)
Follow us on

Suresh Dhas On Prajakta mali : बीडमधील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरण सध्या सातत्याने चर्चेत आहे. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिकी कराड असल्याचे बोललं जात असून तो मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली होती. आता आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या मागणीवर एका वाक्यात उत्तर दिले आहे.

आमदार सुरेश धस यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाची भेट घेतली. त्यासोबत तिने माफी मागण्याची मागणी केली, असे प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. “माझ्यासाठी तो विषय संपला आहे. मी जे होईल, त्याला सामोरे जाणार आहे”, असे सुरेश धस म्हणाले.

“मालमत्ता जप्ता करण्याची प्रक्रिया स्पीडने व्हायला हवी”

“मालमत्ता जप्ता करण्याची मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिली आहे. ती अजिबात थांबू नये. स्पीडने झाली पाहिजे. म्हणजे आकांबरोबर कुणाची प्रॉपर्टी आहे, हे समजून येईल. अजून त्यात टेक्निकली काही प्रॉब्लेम असतील. काही कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय त्यात लगेच गोष्टी होत नाही”, असे सुरेश धस यांनी म्हटले.

“माझ्यासाठी तो विषय संपला”

माझ्यासाठी तो विषय संपला आहे. माझी विनंती आहे. जे काही झालं आहे. त्याला मी सामोरे जाणार आहे. माझी बाजू अनेकांनी मांडली आहे. संतोष देशमुखचा भयानक खून आणि बीडचं जंगल राज यावरून लक्ष डायव्हर्ट करू नका. या प्रकरणावर बोला. मी या प्रकरणावर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बोलेन, असे सुरेश धस यांनी सांगितले.

“ही मालमत्ता कोट्यवधीची आहे”

“मुख्यमंत्र्यांनी मालमत्ता जप्तीचा निर्णय का घेतला. ही मालमत्ता लाखात हजारात नाही. कोट्यवधीची आहे. मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं, तेवढं आम्हाला कळत नाही. पण मुख्यमंत्र्यांनी कराडची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून सर्व गोष्टी स्पष्ट होतात. कुणाकुणाला ट्रान्झेक्शन झालं. हे लोक कोण आहेत? हे पगारदार नोकर आहेत का? कोणत्या अकाऊंटवरून पैसे गेले, हे सर्व नावं मी सांगतो”, असा दावाही सुरेश धस यांनी केला.