वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, आई पारुबाई कराड यांची प्रकृती बिघडली

| Updated on: Jan 14, 2025 | 3:42 PM

पारुबाई कराड या आज सकाळपासून परळी पोलीस स्थानकाच्या बाहेर बसून आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत वाल्मिक कराड यांचे समर्थकही परळी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलनसाठी बसले आहेत.

वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, आई पारुबाई कराड यांची प्रकृती बिघडली
walmik karad mother
Follow us on

बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. त्यातच आता खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचे आंदोलन सुरु केले आहे. आज सकाळपासून वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे पारुबाई कराड यांची प्रकृती बिघडली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. यामुळे बीडमधील वातावरण तापले आहे. त्यातच आज सकाळपासून बीडच्या परळीत मोठ्या घडामोडी सुरु आहेत. एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सातत्याने मोर्चा काढण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता वाल्मिक कराडच्या समर्थकांनीही आक्रमक पावित्रा घेतला आहे. आज सकाळपासून वाल्मिक कराड यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले होते.

पारुबाई कराड यांची प्रकृती बिघडली

पारुबाई कराड या आज सकाळपासून परळी पोलीस स्थानकाच्या बाहेर बसून आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत वाल्मिक कराड यांचे समर्थकही परळी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलनसाठी बसले आहेत. तर दुसरीकडे काही समर्थकांनी परळीत रस्त्यावर जाऊन टायर जाळून आंदोलन केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांची आई पारुबाई कराड यांची प्रकृती बिघाडली आहे. त्यांच्या आईला ब्लडप्रेशरचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत आहे. यावेळी सुरेश धस, मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोला जोडेमार आंदोलनही करण्यात आले. यावेळी काही जणांनी पारुबाई कराड यांच्या आईला पाणी द्यायचाही प्रयत्न केला. मात्र त्यांनी ते पिण्यास नकार दिला.

वाल्मिक कराडची सून आक्रमक 

वाल्मिक कराड यांच्या आईची प्रकृती बिघडली आहे. त्यांनी रात्रीपासून पाणीही घेतलेले नाही. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. पण तुम्ही कायद्याच्या विरुद्ध कशासाठी जात आहात. विनाकारण राजकारण करत आहात. सर्वजण अण्णांना फसवून राजकारण करण्याचे काम करत आहेत. मी त्यांची सून आहे. पण मला त्यांनी लेकीपेक्षा जास्त सांभाळलं आहे. ते योग्य काम करतात. आम्ही इतके दिवस काही बोललो नाही कारण आमचा कायद्यावर विश्वास आहे. पण आता ३०२, मकोका हे गुन्हे लावा अशी मागणी केली जात आहे. तुमच्याकडे काही पुरावे नसताना, तुम्ही कसे काय आरोप करता, असा सवाल वाल्मिक कराडच्या सुनेने केले आहे.

सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड हे सर्वजण कशासाठी हे सर्व करत आहेत. धनंजय मुंडे यांना अडकवण्यासाठी? आज धनंजय मुंडे पालकमंत्री होणार होते. त्यांना अडवण्यासाठी म्हणून हे राजकारण सुरु आहे. आज जर त्यांच्या आईला काही झालं तर याला सर्वस्वी विरोधक जबाबदार असतील, अशा शब्दात त्यांच्या सूनेने आक्रमक प्रतिक्रिया दिली.