Walmik Karad Security : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. या घटनेमुळे सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्याबद्दल अटक करण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर एसआयटीने वाल्मिक कराडचा ताबा घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यासोबत वाल्मिक कराडवर मोक्कादेखील लावण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी आणि बीड पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणावरुन सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. त्यातच आता वाल्मिक कराडला शासनाकडून बॉडीगार्ड देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी ही माहिती उघड केली आहे.
अंजली दमानिया यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांना वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. आता यावर अंजली दमानिया यांनी विविध खुलासे केले आहेत. वाल्मिक कराडला शासकीय बॉडीगार्ड कसा दिला? कोणी दिला? कोणाच्या सांगण्यावरुन दिला? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
वाल्मिक कराड यांच्यावर एक नाही, एकूण 14 एफ आय आर आहे. त्या 14 पैकी दहा परळीमध्ये आता त्याच्यातला मी आणि एक एफ आय आर जो 3 जुलैचा आहे. तो देखील आज ट्विट केला आहे. 108 नंबरचा हा एफ आय आर आहे आणि याच्यात कुठले कुठले कलम आहेत. ते आपण बघूया. 360 म्हणजे जीवे मारण्याची धमकी, 323 म्हणजे कोणाला दुखापत पोहोचवणे, 326 म्हणजे धोकादायक शस्त्रांचा स्वैच्छेने उपयोग करणे, 504 म्हणजे क्रिमिनलेशन, आपण ज्याला म्हणतो ते 143, 147, 46, 47, 48, 49 आणि या व्यतिरिक्त शस्त्र अधिनियमाखाली तीन चार आणि 25 इतके गंभीर गुन्हे त्यांच्यावर या एफ आय आर मध्ये देखील होते, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
इतक्या गंभीर एफआयआर असताना वाल्मिक कराड यांना शासकीय बॉडीगार्ड हा कसा दिला गेला, कोणी दिला, कोणाच्या सांगण्यावरून दिला, गृहमंत्रालयाने तो अप्रूव्ह कसा केला? माझ्यासारखे लोक जे कर भरतात या कराच्या पैशात ना हे बॉडीगार्ड असतात. ज्यांना फक्त धमकी किंवा कोणाला जीवे मारण्याची कोणी जर धमकी आली असेल, अशांना पुरवण्यात ठीक आहे, पण अशा गुन्हेगाराला तुम्ही आता शासकीय बॉडीगार्ड देणार हे अतिशय गंभीर आहे, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.
मला हे मान्य नाही. मला गृहमंत्र्यांनी पोलिसांनी आज सगळ्यात कारवाई या सगळ्या प्रकरणात का केली नाही याचे उत्तर पाहिजे. धनंजय मुंडे यांच्याकडून उत्तर पाहिजे. त्यांनी हा राजकीय दबाव जो होता तो केल्यामुळे या वाल्मिक कराडवर इतके महिने कारवाई झाली नाही का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.