बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या हिंदू विवाहातील वादग्रस्त वक्तव्यावर भर सभेत खळखळून हसत दाद देणाऱ्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आता काहीशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखालल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) अशी भूमिका कदापि नाही. मिटकरी यांचं हे वक्तव्य वैयक्तिक असून मी याविषयावर त्यांना विनंती देखील केली आहे, असं वक्तव्य आता धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ते वैयक्तिकरित्या याचं स्पष्टीकरण देतील असं आश्वासनही धनंजय मुंडेंनी दिलं आहे.
सांगली येथील एका सभेत लग्नातील विधींतील श्लोक म्हणून दाखवताना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी जोशात आले आणि त्यांनी कन्यदान तसेच मम भार्या समर्पयामि या शब्दांवरून भलतंच वक्तव्य केलं. लग्नातील विधींबाबत असं भाष्य मिटकरींनी केलं तेव्हा सभेत एकच हशा पिकला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यावेळी लोट पोट हसून त्यांच्या या वक्तव्याला दिलखुलास दाद दिली. मात्र आता ब्राह्मण महासंघ तसेच अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी मिटकरींच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केल्यानंतर धनंजय मुंडेंनी याबाबत अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली.
अमोल मिटकरींबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ जे वक्तव्य मिटकरी यांनी केलं ते त्या भाषणात एका लग्नाचा संदर्भ देत ते बोलले आहेत. याच्यातही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. मिटकरी यांचं व्यक्तिगत भाष्य होत. राष्ट्रवादी पार्टी म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला होता. मी अमोल मिटकरी यांना आता बोललोय. मी त्यांना विनंती देखील केलीय. बघुयात ते काय करतात. मला असं वाटतं कुठल्याही समाजाचा कुठल्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. जात पात धर्म हे आमच्या अंगाला देखील शिवलं नाही. आम्ही त्याच संदर्भात हसत होतो. असा संदर्भ कुठेही येत नाही. ते जे बोलले ते वयक्तिक बोलले. मिटकरी स्वतः स्पष्टीकरण देतील.
इतर बातम्या-