VIDEO | पीपीई किट घालून गाण्याची गुणगुण, परळीतील वेडसर व्यक्तीमुळे नागरिकांना धास्ती

| Updated on: May 26, 2021 | 11:32 AM

बीड जिल्ह्यातील परळी शहरात वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात असल्याचं समोर आलं आहे (Beed Parali Man PPE Kit)

VIDEO | पीपीई किट घालून गाण्याची गुणगुण, परळीतील वेडसर व्यक्तीमुळे नागरिकांना धास्ती
परळीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्याचा व्हिडीओ
Follow us on

परळी (बीड) : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून यापासून बचाव करण्यासाठी मास्क, पीपीई किट, हातमोजे वापरणे गरजेचे आहे. मात्र वापरुन झाल्यानंतर त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणेही तितकेच गरजेचे आहे. पीपीई किट उघड्यावर फेकल्याने धोकादायक ठरु शकतात. अशातच वापरुन फेकलेले पीपीई किट घालून परळीच्या रस्त्यावर एक वेडसर व्यक्ती गाणे म्हणत फिरत असल्याने नागरिकांना धडकी भरली आहे. (Beed Parali Man roaming wearing PPE Kit increases tension)

परळीतील रस्त्यावर फिरणारी वेडसर व्यक्ती

बीड जिल्ह्यातील परळी शहरात वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात असल्याचं समोर आलं आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट, हातमोजे, मास्कच्या कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. कचऱ्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. यातच मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास एका वेडसर व्यक्तीने धुमाकूळ घातला. चक्क वापरुन फेकलेले पीपीई किट घालून तो परळी शहरातील रस्त्यावर गाणे म्हणत फिरत होता.

पाहा व्हिडीओ :


परळीच्या कचरा संकलनात रस्त्याच्या कडेला रुग्णालयात वापरण्यात येणारी सुरक्षा उपकरणे फेकली जात आहेत. वापरलेले पीपीई किट, हातमोजे, मास्क रस्त्यावर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पीपीई किटचा निचरा जिथल्या तिथे झाला पाहिजे. परंतु हा कचरा रस्त्यावर येत असल्याने कोरोना काळात ही धोकादायक बाब मानली जात आहे.

जैविक कचऱ्याचा प्रश्न बिकट

याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जैविक कचऱ्याची विल्हेवाट प्रशासनाने नेमून दिलेल्या निर्देशांप्रमाणे लावणे बंधनकारक आहे. घातक कचरा उघड्यावर फेकणे गुन्हा आहे. याकडे संबंधित यंत्रणेने तात्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरातून होणारे प्रयत्न लक्षात घेता वेडसर व्यक्तीने वापरलेला पीपीई किट घालून मोकाट फिरण्याचा प्रकार धक्कादायक आहे. दुर्दैवाने असाच एखादा व्यक्ती ‘सुपर स्प्रेडर’ होऊन धोकादायक ठरु शकतो, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.

संबंधित बातम्या :

परळी वैद्यनाथ मंदिराबाहेरील भिकाऱ्याला पोलिसात देवाचे दर्शन, चोरीचे पावणेदोन लाख तासांत सापडले

(Beed Parali Man roaming wearing PPE Kit increases tension)