बीड : वाढत्या कोरोना संसर्गाला (Corona Updates) आळा घालण्यासाठी बीडचं प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. आधी व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी मगच त्यांना दुकाने उघडायला परवानगी मिळेल, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. (beed traders Corona test Compulsory Collector Ravindra jagtap order)
बीड शहरातील अनेक व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने यापुढे शहरातील व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कोरोनाची चाचणी टेस्ट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आजपासून चार ठिकाणी चाचणी होणार असून दिवसाकाठी 1 हजार 600 चाचण्या करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी केल्याशिवाय व्यापाऱ्याला आपलं दुकान उघडता येणार नाही किंबहुना व्यवसाय थाटता येणार नाही. जे कुणी नियमांचं पालन करणार नाही त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कारागृहातील कैद्यांशी प्रत्यक्ष भेटीस आता मनाई करण्यात आली आहे. नातेवाईक, वकील यांना भेटीऐवजी व्हिडिओ कॉल व डेडीकेटेड ई-मेलव्दारे संवाद साधता येणार आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जेल प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिलेत.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाला बरोबर एक वर्ष पूर्ण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात कोरोना रुग्ण सापडलेल्या घटनेला मंगळवारी बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत.
(Beed traders Corona test Compulsory Collector Ravindra jagtap order)
हे ही वाचा :
कोरोना नियमांचं उल्लंघन, एकाच दिवशी 50 हजार रुपयांचा दंड वसूल, नागपूर महापालिकेचा दणका