बीड : बीड शहरात (Beed fighting) आज सकाळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये वाद सुरु झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. काही वेळानं तरुणांनी लाठ्या-काठ्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. शहरातील मध्यवर्ती भागात (Shivaji Maharaj Chauk) भर रस्त्यात दोन गटात हा वाद सुरु होता. यामुळे वाहतूक (Beed City) बराच वेळ खोळंबून राहिली. तरुणांनी हातात काठ्या घेतल्यानं या घटनेची माहिती तत्काळ पोलीसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हा वाद शांत करण्यात आला. तोपर्यंत बीडमध्ये या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.
बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली. घटनास्थळी दाखल असलेल्या प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, झेंडा विक्रीवरून या वादाला सुरुवात झाली. पाहता पाहता दोन गट या वादात परस्परांशी भिडले. लाठ्या काठ्यांनी भर रस्त्यावरच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. अचानक दोन गट आमनेसामने आल्याने थोडा काळ तणाव झाला, शिवाय वाहतूक देखील बऱ्याच काळ खोळंबून राहिली. तब्बल पंधरा मिनिटानंतर दोन्ही गटातील वाद शांत झाला.
बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी वाद शमवला आहे. मात्र काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण होते. जवळपास पंधरा मिनिटे येथील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. जमाव पांगल्यानंतर शिवाजी चौकातील वाहतूक सुरळीत झाली.
इतर बातम्या-