PHOTO | बीडमध्ये गोळीबाराच्या घटनेनं खळबळ, रजिस्ट्री कार्यालय परिसरात दोघे जखमी, काय घडलं?

| Updated on: Feb 25, 2022 | 1:13 PM

गोळीबार झाल्यानंतर काही  वेळातच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमींना जिल्हा रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. प्राथमिक चौकशीनुसार, जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याची माहिती हाती आली आहे.

PHOTO | बीडमध्ये गोळीबाराच्या घटनेनं खळबळ,  रजिस्ट्री कार्यालय परिसरात दोघे जखमी, काय घडलं?
Follow us on

बीडः शहरातील जिल्हाधिकारी (Beed collector office) कार्यालय परिसरातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयाबाहेर आज सकाळी अकरा वाजता गोळीबार (Firing in Beed) झाला. या परिसरातील दोन नागरिकांच्या दिशेने गोळी झाडण्यात आली. दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. क्षणभर काय झालं ते कुणाला कळलंच नाही. नंतर जखमी झालेल्या दोघांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात (Government hospital) नेण्यात आलं. घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण होतं, पोलीस दाखल झाल्यानंतर ताण निवळला.

सतीश बबन क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी अशी या घटनेतील जखमींची नावं आहेत. 25 फेब्रुवारी रोजी हे दोघे सकाळी मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार झाला. काही  वेळातच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमींना जिल्हा रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. प्राथमिक चौकशीनुसार, जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याची माहिती हाती आली आहे.

घटनास्थळी तणावपूर्ण शांतता

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. पोलीस अधीक्षक आर राजा, अप्पर पोलीस सुनील लांजेवर यांच्यासह प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रश्मीथा एन राव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच येथे दंगल नियंत्रण पथकदेखील दाखल झाले. पोलिसांना हा परिसर सील केला असून पुढील तपास सुरु आहे.

इतर बातम्या-

युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सुरू; कुठे मिळेल मदत?

Akola Student | युक्रेनमध्ये अडकलाय अकोल्याचा जॅकशारोन! जॅकला परत आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न