Pankaja Munde : कोणी 22 वर्षांचा तर कोणी एकटाच कमावणारा; पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर जीव देणारे चार तरुण कोण?

| Updated on: Jun 18, 2024 | 5:32 PM

Beed Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात अटीतटीचा सामना रंगला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्या धक्क्यामुळे त्यांच्या चार समर्थकांनी आत्महत्या केली. मुंडे यांनी तरुणांना असे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे.

Pankaja Munde : कोणी 22 वर्षांचा तर कोणी एकटाच कमावणारा; पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर जीव देणारे चार तरुण कोण?
पंकजा मुंडे व्यथीत
Follow us on

राज्यातील बिग फाईट ठरलेल्या बीड मतदारसंघात भाजपला मोठा झटका बसला. अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्याचा धक्का सहन न झाल्याने चार समर्थकांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये एक 22 वर्षांचा तरुण पण होता. नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी त्याच्या कुटुंबियाची भेट घेतली. असे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन त्यांनी केले. जर कोणी आत्महत्या करेल तर राजकारण सोडण्याचे मत त्यांनी जाहीर केले.

चार समर्थकांच्या हत्येने हळहळ

हे सुद्धा वाचा

4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागला. महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. 6,000 हून अधिक मतांनी सोनवणे विजयी झाले. या धक्क्यामुळे बीड जिल्ह्यातील गणेश उर्फ हरीभाऊ बडे या तरुणाने जीवन संपवले. त्यापूर्वी लातूरमधील सचिन कोंडीबा मुंडे, पांडुरंग रामभाऊ सोनवणे, पोपट वायभासे यांनी आत्महत्या केली.

मी पांडुरंग सोनवणे, माझी पंकजाताई मुंडे निवडणुकीत पराभूत झाली. मी हे सहन करु शकत नाही, म्हणून आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी लिहून सोनवणे या तरुणाने आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याला अस्वस्थ वाटत असल्याने दवाखान्यात भरती करण्यात आले होते. शरीर दुखत असल्याचे तो म्हणत होता. पार्टी मिटिंग आहे, पंकजा मुंडे येणार आहेत, असे तो म्हणत होता.

या घटनांनी पंकजा मुंडे यांना धक्का

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली. कोणत्याही नेत्यावर इतकं प्रेम करु नका की त्यासाठी तुम्ही जीव द्यावा, असे त्या म्हणाल्या. तुम्हाला जर हिंमतीने लढणारा नेता हवा असेल तर मला हिंमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे. कार्यकर्त्यांना मी यंत्रासारखे वापरले नाही. कुटुंबापेक्षा त्यांना अधिक जवळचे समजते. आज मी पहिल्यांदा कमकुवत झाली आहे. आज मला आपराध्यासारखं वाटत आहे. या घटनांमुळे आपण व्यथित असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्या ढसाढसा रडल्या.

जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे

दरम्यान निवडणूक काळात जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या. निकालनंतर ही सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट दिसल्या पोलिसांनी अशा प्रकरणात 36 एफआयआर नोंदवले आहे. प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात ऊस कामगार अधिक आहे. सोशल मीडियावरील पोस्टने पोलिसांची झोप उडवली आहे. पोलिसांनी सोशल मीडियावरील अशा पोस्टसंबंधी माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच या पोस्टवर प्रतिक्रिया अथवा त्या फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे.