बीडः निवडणुका तोंडावर आल्यानंतर राजकीय पुढारी आणि प्रशासकात नेहमीच वाद होतात. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्येही (Majangaon Nagar Parishad) असाच वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष मंजूर शेख यांनी बनावट ठराव घेऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस (Sahal Chaus) यांनी केला आहे. माजलगावचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष मंजूर शेख (Manjur Shaikh) यांनी बोगस ठराव घेऊन लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपावरून जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणी भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे. दरम्यान टेंडर मंजूर झालेच नाही त्यामुळे भ्रष्टाचार झाला कुठून असा प्रतिसवाल नगराध्यक्ष मंजूर शेख यांनी केलाय. त्यामुळे माजलगावचे राजकारण पेटले आहे.
राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष मंजूर शेख यांनी बनावट ठराव घेऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. एवढेच नाही तर अधिकाऱ्यांची तक्रार करून थेट पैसे मागतात असा गंभीर आरोप चाऊस यांनी केलाय..
मात्र माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी केलेल्या आरोपाचे नगराध्यक्ष मंजूर शेख यांनी खंडन केले आहे. मी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही उलट माजलगावच्या नागरी सुविधा पुरविण्याचे काम केले आहे मात्र भाजप चे माजी नगराध्यक्ष यांनी प्रशासकाला हाताशी धरून बिनबुडाचे राजकारण करीत असल्याचा प्रत्यारोप मंजूर शेख यांनी केलाय.
येत्या काही दिवसात माजलगाव नागरपरिषदेची निवडून होऊ घातलीय, त्याच धर्तीवर भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्वाची नागरपरिषद म्हणून माजलगावकडे पाहिले जात असले तरी आरोप- प्रत्यारोपातून माजलगावचे राजकारण सध्या तरी पेटले आहे.
इतर बातम्या-