शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त शिवसंग्राम पक्षाच्या वतीने बीडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विनायक मेटे यांच्या कार्यचा उल्लेख केला. दिवंगत विनायक मेटे यांचं मराठा आरक्षणासाठी बलिदान आहे. त्यामुळे समाज कधीही विसरणार नाही. विनायक मेटेंना आम्ही अभिवादन करणार आहोत. एक मेलातरी चाललं पण एक मराठ्याच्या पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे. मी वेळ आलोतर बलिदान द्यायला तयार मराठ्यांना आरक्षण देवूनच राहणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दिवंगत विनायक मेटे यांचं मराठा आरक्षणासाठी बलिदान आहे. त्यामुळे समाज कधीही विसरणार नाही. त्या निवडणूक लढविणार असतील तर त्यांची ईच्छा आहे. त्यांनी का बाळगू नये. मी निवडणूक लढविणार नाही. मराठा ओबीसी समाजात अस्वस्थता नाही. छगन भुजबळ तसे भासवत आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा मी सर्वात जास्त सन्मान करतो. ते खूप अभ्यासू आणि परखड बोलणारे आहेत. परखड बोलणारे मला खूप आवडतात, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
13 तारखेला आरक्षण दिले नाही. तर पुढील तयारी करावे लागेल. मी लोकसभा निवडणुकीत कोणालाही नाव पाडा असं म्हटलो नाही. यावेळी मात्र नाव घ्यावे लागेल. सरकार आले तर पाच सात उपमुख्यमंत्री होतील. सर्वच जातीला मी प्राधान्य देणार नाही. मात्र मी निवडणुकीत उभा राहणार नाही. मी शब्दाला पाळतो. छगन भुजबळ शब्द पाळत नाहीत. कोणाला निवडणुकीत मदत करायची हे मी आताच सांगणार नाही. राजकारण हे गुप्त असते. आणि मला याच राजकारण्यांनी शिकविले आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
स्वातंत्र्यांनंतर ओबीसींना मिळालं आम्ही 150 वर्षापासून आरक्षण आहोत. ओबीसी नेत्यांना मात्र हे समजत नाही. आमची जमीन असताना त्या सातबारावरचं नाव खोडा असं तुमचं म्हणणं आहे. 57 लाख नोंदी मिळाल्या मराठ्याच्या त्या नोंदी रद्द करायला सांगतात मग जातीवादी कोण? आम्ही मराठा ओबीसीतूनचं आरक्षण घेणार आहोत, असं जरांगे म्हणालेत.