Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणात पुन्हा एल्गार? मस्साजोगमध्ये हालचाली वाढल्या, दुपारी मोठा निर्णय होणार

| Updated on: Jan 12, 2025 | 9:20 AM

Massajog Villagers Meeting Today : संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. जनरेट्यापुढे यंत्रणा आणि सरकारला झुकावे लागले. प्रकरणात सात आरोपींना मकोका लागला. तरीही तपासावर प्रश्नचिन्ह आहे. आज मस्साजोग ग्रामस्थांची दुपारी बैठक होत आहे.

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणात पुन्हा एल्गार? मस्साजोगमध्ये हालचाली वाढल्या, दुपारी मोठा निर्णय होणार
मस्साजोगमध्ये आज बैठक
Follow us on

बीड मधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण खून करण्यात आला. जनरेट्यापुढे यंत्रणा आणि सरकारला झुकावे लागले. प्रकरणात सात आरोपींना मकोका लागला. तरीही तपासावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. वाल्मिक कराड याला याप्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी गोटातील आमदारांनी हे प्रकरण लावून धरले आहे. तर आज मस्साजोगमध्ये ग्रामस्थांची बैठक होत आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज ग्रामस्थांची बैठक होत आहे.

कृष्णा आंधळे अद्याप फरार

सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्तेला आज 33 दिवस पूर्ण होत आहेत. यातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन देखील केले होते. मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कांवल यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते.

हे सुद्धा वाचा

आज दुपारी बैठक

आता पुन्हा एकदा आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज दुपारी 12 वाजता मस्साजोग येथे ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन केले आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते. पोलीस अधिक्षकांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आज होणार्‍या बैठकीत काय निर्णय होतो हे समोर येणार आहे. दरम्यान वाल्मिक कराडला अभय मिळत असल्याची भावना पण तीव्र होत असल्याने आता बैठकीत काय दिशा ठरेल हे पाहणे गरजेचे आहे.

वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का?

वाल्मीक कराड हा सरकारचा जावई असल्यासारखा त्याला वागवला जात आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्य अंजली दमानिया यांनी केला होता. वाल्मीक कराड यांचं सगळ्यांबरोबर अगदी चांगलं गणित आहे. त्याच्यावर धनंजय मुंडे आणि काही प्रमाणात पंकजा मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप दमानिया यांनी काल केला. जोपर्यंत दबाव आहे, तोपर्यंत वाल्मिकवर मकोका लावण्यात येणार नाही असा आरोप त्यांनी केला. वाल्मीक कराड याला का वाचवण्यात येत आहे? असा सवाल विचारण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.