आज दसऱ्याचा सण… बीडमधील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा सुरु आहे. प्रथम या जनसमुदायाच्या चरणी मी मनापासून नतमस्तक होत आहे. खरंच वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल. मी खोटं बोलत नाही. अर्ध्याच्यावर लोकं सरकारी दवाखान्यात जातील. नजर जाईल एवढे लोकं येतील असं खरंच वाटलं नव्हतं. मला एकजण म्हणाला, ह्यँ ह्यँ केलं. ५०० एकर असतं का कुठं असं म्हणत होता. आता तो दिसत नाही. मी मीडियाला कधीच विनंती केली नाही. पण आता करतो. चारही बाजूला कॅमेरे फिरवा. तुम्ही फ्रेम दिले असले तरी एकदा मात्र हा जनसमुदाय राज्याला दिसू द्या. कानाकोपऱ्यातील बांधव दिसू द्या. एकदा दाखवाच. नुसती गर्दी पाहूनच त्यांचा कार्यक्रम होईल, असं जरांगे म्हणाले. आमच्यावरच अन्याय का?, जगागीरदाराची अवलाद आली तरी मराठा समाज झुकणार नाही, असंही जरांगे म्हणाले.
पाडळशिंगी पर्यंत चारही मार्ग लॉक आहे. बीडमध्ये सर्व रस्ते जाम आहेत. कधी वाटलं नव्हतं आपण या ताकदीने एकत्र याल म्हणून. हा जनसमुदाय न्यायाचा आहे. एका दुखाकडून सुखाकडे जायचं आहे. या समुदायावर संस्कार आहेत. संस्कार. ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय आहे. या राज्यावर समुद्रासारखा पसरला आहे. पण कधीच मस्तीत आणि मग्रुरीत हा समाज वागत नाही. कधीच हा समुदाय मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं, साथ देण्याचं काम केलं आहे. यांनी कधी जातीवाद केला नाही. त्यांना कधी जात शिवली नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावरून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांकडून शब्द घेतला. मला एकच वचन द्या, मला तुमच्याकडून जास्त काही नको. तुम्ही मला एकच वचन द्या. मग मी मात्र तुम्ही म्हणाल ते करेल. फक्त हट्ट धरू नका. एकच वचन द्या, असं जरांगे म्हणाले नारायण गडावरच्या सभेत म्हणालेत.
जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावे लागेल, मला हे वचन द्या. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण मला तुमच्याकडून एकच वचन हवे. मला राजकारण आणि जातीचं या गडावरून बोलायचं नाही. तुमचं हित सोडून मी तुमच्या पुढे जाणार नाही, तुमचं काम सोडून जाणरा नाही हा गडावरून शब्द देतो, असं मनोज जरांगे म्हणालेत.