परळी : मागच्या अनेक दिवसांपासून बीड (BEED) जिल्ह्यातील परळी (PARLI) तालुक्यातील आदिवासी पारधी कुटुंबाची (Tribal Pardhi family) जोरदार चर्चा सुरु आहे. मागील दहा वर्षापासून हक्काचं घर मिळावं यासाठी कुटुंबियाने दहा वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या अंगणात आंदोलन केलं. त्याचवेळी आंदोलन करीत असताना अप्पाराव पवार या कुटुंब प्रमुखांचा मृत्यू झाला. त्यावेळी संपुर्ण बीड जिल्हा हळहळला होता. मात्र मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पीडित आदिवासी कुटुंबाने आता तहसिलदार परिसरात ठिय्या मांडला आहे.
हक्काचं घर मिळावं यासाठी बीडमधील आदिवासी पारधी कुटुंब गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या दारात आंदोलन करत आहे. आंदोलना दरम्यान अप्पाराव पवार यांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यावेळी संपूर्ण बीड जिल्हा हळहळला होता. तरीही घर मिळाले नसल्याने पीडित आदिवासी कुटुंबाने आता तहसिल परिसराचा आसरा घेतला आहे. बीडच्या तहसिल परिसरात उघड्यावरच पारधी कुटुंबाने प्रपंच मांडल्याचं चित्र दिसतं आहे. पारधी कुटुंब येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्यात या प्रकाराची चर्चा सुरु आहे.