मोठी बातमी! सुरक्षेच्या कारणामुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय

| Updated on: Mar 19, 2025 | 7:18 PM

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांंचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली, आता या प्रकरणात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! सुरक्षेच्या कारणामुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय
santosh deshmukh
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांंचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं आहे, तसेच एसआयटी देखील गठीत करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात सीआयडीनं आरोपपत्र देखील दाखल केलं असून, न्यायालयीन सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला आता बीड जिल्हा सत्र न्यायालयात चालवला जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयात चालवला जावा असा विनंती अर्ज करण्यात आला होता, या विनंती अर्जासाठी काल बीडच्या न्यायालयात दोन्ही पक्षाचे वकील हजर होते. काल युक्तिवाद झाल्यानंतर आज या प्रकरणात न्यायालयानं निकाल दिला आहे. या निकालानुसार  इथून पुढे  सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालवला जाणार आहे. यासंदर्भात सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी माहिती दिली.

आतापर्यंत काय -काय घडलं? 

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यात वातावरण चांगलंच तापलं. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केलं. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली. मात्र या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं. या प्रकरणात एसआयटी देखील स्थापन करण्यात आली. त्यानंतर सीआयडीनं या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं. वाल्मिक कराड हाच या घटनेचा मास्टर मांईड असल्याचं सीआयडीच्या आरोप पत्रात म्हटलं आहे. दरम्यान आरोप पत्र सादर केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो  सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापलं, आता या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे.