‘दादा तुम आगे बढो’च्या घोषणा देताच अजित पवार संतापले; म्हणाले आता कुणी…

| Updated on: Oct 01, 2024 | 3:35 PM

DCM Ajit Pawar in Jansanman Yatra : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीडमध्ये आहे. या जनसन्मान यात्रेत उपस्थितांना अजित पवारांनी संबोधित केलं. तेव्हा लाडकी बहीण योजनेवर अजित पवार यांनी भाष्य केलं. अजित पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...

दादा तुम आगे बढोच्या घोषणा देताच अजित पवार संतापले; म्हणाले आता कुणी...
अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सध्या सुरु आहे. आज ही यात्रा बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये आहे. या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजलगावच्या नागरिकांना संबोधित केलं. अजित पवार यांचं भाषण सुरु होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. पण पुढे बराच वेळ अजित दादांच्या नावाने घोषणा दिल्या जाऊ लागल्या तेव्हा अजित पवार संतापले. घोषणाबाजी करू नका, म्हणत अजित पवार कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला. आता कोणीही घोषणा देऊ नका…, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार माजलगावमध्ये काय म्हणाले?

बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची भूमी आहे. महात्मा महापुरुषांची भूमी आहे. महायुतीच्या सरकारला बळ दे… असे आशिर्वाद मी इथल्या देव देवतांकडे मागतो. मला पाच वर्षात केवळ तीन वर्ष काम करण्यासाठी मिळाले. 15 नोव्हेंबरला साखर कारखाने सुरू होण्याचा बैठकीत आम्ही निर्णय घेतला आहे. राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्या त्या ठिकाणी मी जन सन्मान यात्रा घेऊन जात आहे,
लाडकी बहीण योजना दिली.. विरोधकांच्या पोटात दुखत आहे, असं अजित पवार म्हणाले.

विरोधकांवर निशाणा

लाडकी बहिण योजनेवरून विरोधक टीका करतात आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. ते सत्तेत असताना कोणती योजना आणली? माय माता माऊलींसाठी आम्ही ही योजना आणली आहे. ज्यांच्याकडे सुविधा आहेत ते विमानानं त्यांच्या प्रायव्हेट वाहनानं जातात. मात्र गरिबांसाठी काय? म्हणून माता माऊली साठी लाडकी बहीण योजना आणली. तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे तुम्हीच कधीही केव्हाही काढू शकता, असं अजित पवारांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यावर अजित पवारांनी भाष्य केलं. तोंडावर निवडणूक आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मतदारसंघात काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी कमळ, काही ठिकाणी धनुष्यबाण असे चिन्ह असेल. त्यांना निवडून द्यायचं आहे. राज्यात आमच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील त्यापैकी दहा टक्के जागा अल्पसंख्यांक समाजाला देणार आहोत. लोकसभेला आम्ही कमी पडलो. बीडची जागा सहा – सात हजाराने गेली. आम्हाला वाईट वाटलं, असं म्हणत अजित पवारांनी मनातील सल बोलून दाखवली.