बीड : वयाची 89 वी सर केलेल्या बीडच्या सत्यभामा शिंदे (Satyabhama Shinde). माणसांतल्या विकृती राक्षसी वृत्तीने आणि प्रशासनाने डोळ्यादेखत केलेली फसवणूक पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. सत्यभामा यांचे पती हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना विविध प्रमाणपत्रांनी गौरवण्यात देखील आलंय. स्वातंत्र्यानंतर रंगनाथ शिंदे यांना उदरनिर्वाहासाठी त्याकाळी मद्य विक्रीचा परवाना (Liquor Sales License) देण्यात आला. आष्टी येथे त्यांचा व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र सत्यभामा यांच्या पतीच्या निधनानंतर काही जणांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना (Administration Officer ) हाताशी धरत बनावट कागदपत्रे तयार केली. परस्पर दुकान परवाना नावे केला. नव्वद वर्षीय सत्यभामा शिंदे यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून देह त्यागाची परवानगी मागितली आहे.
बनावट दस्तऐवज तयार करून मद्य विक्रीचा परवाना परस्पर दुसऱ्याच्या नावे करण्यात आलं. त्यामुळं बीडमधील स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा आणि वयस्कर पत्नीने थेट राष्ट्रपतींकडे देह त्यागाची परवानगी मागितली आहे. याबाबत सत्यभामा शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडलीय. सत्यभामा यांनी अनेक शासकीय कार्यालयाची उंबरे झिजविली. न्याय तर सोडाच परंतु पदरी निराशाच मिळाली. आता त्या प्रचंड थकल्या आहेत. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी सत्यभामा शिंदे यांनी केलीय. वेळोवेळी प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून देखील न्याय मिळत नाही.
राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी देहत्यागाची मागणी केलीय. मात्र यावर अद्याप कोणाचेही उत्तर मिळाले नाही. स्वातंत्र्य लढ्यात संपूर्ण आयुष्य झिजविणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा पत्नीला स्वातंत्र्य भारतात आणि पुरोगामी महाराष्ट्रात देहत्यागाची मागणी करावी लागतेय, हे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सणसणीत चपराक आहे.
मी आता थकली. कष्ट करू करू पीट झालं नाही. राष्ट्रपतींना पत्र दिलं. पंधरा दिवसांत दुकानं द्यावं, नाहीतर जगून काय करू. देहदानाची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी केली. ते प्रत्युत्तर देतील की, नाही माहीत नाही. काय नशिब आपलं. तेवढं काही कळतं नाही मला. आम्ही जुने लोक. असं म्हणून त्यांना अश्रू अनावर झाले.