मराठा आरक्षणाची धग संपली नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नगद नारायण गडावर त्यांनी दसरा मेळावा घेतला. त्या मेळाव्यात जाता जाता जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. आचारसंहितेची डेडलाईन देत त्यांनी मराठा आरक्षणावर वेळीच भूमिका न घेतल्यास गणित उलटवण्याचा इशारा दिला. दसरा मेळाव्यात जाता जाता काय म्हणाले जरांगे पाटील?
आता सुट्टी नाही, उखडून फेकावंच लागणार
यांना उखडून फेकावंच लागणार आहे. सुट्टी नाही. आपल्यावर डोळ्यादेखत अन्याय करत असेल तर समोरच्याला उखडून फेकावंच लागेल, त्याशिवाय सुट्टी नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. अनुदान नाही, पिकविमा नाही, मराठा आरक्षण नाही, धनगर आरक्षण नाही, कैकाडी, महादेव कोळी, लिंगायत यांना खाऊ दिलं जात नाही. मुस्लिम आणि दलितांना काही दिलं जात नाही. आपणच सर्वांसाठी झुंजत आहोत. आपणच सर्वांना न्याय देणार आहोत, काही लोक कशासाठी भिजत आहे. आपण जातीसाठी भिजत आहोत. काय होतं त्याला. याला शुभसंकेत समजा. आता तर गाडलेच समजा, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारला असा दिला अल्टिमेटम
एक गोष्ट लक्षात ठेवा. शेवटी आपल्यापुढे पर्याय नाही. मुख्य भूमिका तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. आचारसंहितेनंतर तुम्हाला मुख्य भूमिका सांगणार आहे. यांनी आपल्याला फसवलं. आता आपल्यापुढे एकच पर्याय. आचारसंहिता लागू द्यायची. नारायण गडावरून सांगतो, सरकारला सांगतो… सरकार… ओय सरकार… (दंड थोपटले) सुट्टी नाही भाऊ, आचारसंहिता लागायच्या आत राज्यातील प्रश्नाची अंमलबजावणी करायची. नाही केली तर आचारसंहिता लागल्यावर सांगेल ते करायचं. एक विचारानं सांगा करणार का. कारण इथून मला तुम्हाला निर्णय देता येत नाही. यांचं सर्व बघायचं, असा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिला.
आता मागं हटणार नाही
त्यांनी सर्व केल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. त्यांनी सर्व केलं तर गणितच उलटवून टाकायचं. एकाएकी निर्णय विचकटून टाकायचं. तुमच्या मनात जे ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. तुमची शान, तुमची लेकर सुखी करण्याची जबाबदारी माझी. माझ्या खांद्यावर घेतली. फक्त वेळप्रसंगी सांगेल तेव्हा ते ताकदीने करायचं. एकानेही मागे हटायचं नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुन्हा एकदा सरकारला सांगतो, आचारसंहिता लावायच्या आत किंवा आचारसंहिता लावू नका. पण या जनतेच्या सर्व मागण्या मान्य करा. आचारसंहिता लागण्याच्या आत करा.तर तुम्ही आम्हाला खुन्नस देऊन आमचा अपमान केला आमच्या डोळ्यात चटणी टाकून अपमान केला तर तुम्हाला मागे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.