ओबीसी आंदोलनानंतर राज्यात अनेक भागात, बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा वादाला फोडणी घालण्याचे काम करण्यात येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी याप्रकरणी रोखठोक भूमिका जाहीर केली आहे. हे आंदोलन कुणाच्या इशाऱ्यावरुन करण्यात येत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. तर सरकारला विधानसभेपूर्वची एक मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे आता 13 जुलैनंतर राज्यात काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मेटे यांना मराठा समाज विसरणार नाही
गोरगरीब लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे असं विनायक मेटे यांचं स्वप्न होतं. मेटे यांचं बलिदान मराठा आरक्षणासाठी गेला आहे. मराठा समाज त्यांना कधीही विसरणार नाही. त्यांचे स्वप्न.पूर्ण करण्याची जबाबदारी समाजाच्या खांद्यावर आहे. कोणीही मागे हटायचे नाही. 100 टक्के मराठा मोठा करायचं आहे, म्हणून ही लढाई आहे. मेटे यांची जयंती आहे, मी खोटे बोलणार नाही. जातीवाद केला नाही. आणि कधी करणार देखील नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
छगन भुजबळांवर ओढला आसूड
जातीयवाद कोण करते हे सर्वाना माहिती आहे. येवलावाल्याने सगळा माल जमवला आहे, असा आसूड त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर ओढला. 18 व्या शतकात मराठवाड्यात आरक्षण होते. मात्र आम्हाला स्वातंत्र्यानंतर आरक्षण दिले. ओबीसी का समजून घेत नाही. तुमच्या आधी आम्हाला आरक्षण मिळाले आहे. – 57लाख आमच्या नोंदी रद्द करा म्हणताय. मग जातीवाद कोण करते आहे. आम्ही आंदोलन उभ केलं, की आमच्यापुढे तुम्ही बसविता. आम्ही मुक मोर्चे काढले आणि तुम्ही प्रतीमोर्चे काढले.
आम्हाला ही वाटते आमचं विकास झाला पाहिजे. आमच्याही लेकरांचे स्वप्न आहेत जातीवाद झाला म्हणून तुम्ही टोळके जमा करत आहेत. आमची धमकी नाही, हे आमचं हक्क आहे. तुम्ही तुमच्यात परिवर्तन करा. आम्ही एक आलो की जातीयवाद, तुम्ही एक आलात की संविधानीक .. हे असे कसे? येवलावाल्याने सगळा माल जमा केला. मेटे यांनी जातीवाद केला नाही.आमच्या आया बहिणीवर हल्ला झाला. लेकराचे हाल बघून जागचे हलले नाहीत. आम्ही एक झालो तर तुमच्या पोटात दुखते. आमचे आंदोलन सुरू असताना अंबड येथे सभा का घेतली. कोण करतेय जातीवाद, असा सवाल त्यांनी केला.
मनोज जरांगे यांचा इशारा
मराठ्यांनी मनावर घेतले तर निवडणूक काळात राज्यात काहीही होवू शकते. राज्यात मराठे 55 टक्केच्या वर आहेत. आमची जात काढू नका. तुम्ही मनगट दाखविण्याची भाषा करू नका. मराठ्याच्या हे जन्मापासून रक्तात आहे. ओबीसी बांधवांनो शांतता बाळगा. तुमचे नेते तुमच्यासोबत खोटे बोलत आहेत. तुमच्या आधी मराठ्यांना आरक्षण आहे. 13 तारखेला निर्णय घ्या. अन्यथा 288 मधील एकही निवडून आणू देणार नाही. मी धोका कधी करत नाही. मी खोटं बोलत नाही. आरक्षण दिले नाहीत तर पडायचे की निवडून आणायचे हे मी सांगेन. मी नाव घेऊन पाडा असे सांगेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.