मला वाघीण म्हणतात अन् वाघीण शिकार केल्यावर…; पंकजा मुंडेंच्या भाषणाची बीडमध्ये जोरदार चर्चा

| Updated on: May 02, 2024 | 7:09 PM

Pankaja Gopinath Munde on Beed Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे बीड जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी स्थानिकांशी पंकजा मुंडे संवाद साधत आहेत. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी बीडकरांना विकासकाम करण्याचं आश्वासन दिलं.

मला वाघीण म्हणतात अन् वाघीण शिकार केल्यावर...; पंकजा मुंडेंच्या भाषणाची बीडमध्ये जोरदार चर्चा
राज्यसभेवर वर्णी?
Follow us on

बीडमधून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या महायुतीच्या उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील ठिकठिकाणी सभा घेत आहेत. बीडच्या चिंचाळा गावात पंकजा मुंडे यांची आज सभा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मला वाघीण म्हणतात… वाघीण शिकार केल्यावर एकटे खात नसते. ती तिच्या पिला बाळांसाठी राखून ठेवते. मी एक स्त्री आहे. येत्या 13 तारखेला मला मतदान करा. मीही चुकणार नाही. तुम्हीही चुकू नका. मी थकणार नाही. रुकणार नाही आणि कोणापुढे ही झुकणार नाही, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

बीडकरांना आवाहन काय?

13 मे रोजी मोठ्या सन्मानाने मला संसदेत पाठवा, ही विनंती आहे. 2009 ला मुंडेसाहेबांच्या प्रचाराला फिरत होते. तेव्हा माझी हाडं खिळखिळी झाली होती. माझ्या काळात हा जिल्हा मी टँकर मुक्त केला. जलशिवार योजना ही माझीच संकल्पना होती. या जिल्ह्यात मी पालकमंत्री म्हणून सर्वात काम चांगले काम केले आहे. त्याचमुळे लोक माझ्या पाठिशी आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी कोणाचीही चहा पिऊन मिंदी नाही. गृहिणीसारखं मी बीड जिल्हा सजविण्याचे काम केले आहे. मुलींची संख्या कमी होती, गर्भपात रोखून हे चित्र मी बदललं. इज्जत आणि स्वाभिमान गोपीनाथ मुंडे यांच्या वारसाने दिली आहे. माझ्या आदर्श अहिल्याबाई होळकर आहेत. मी जात नाही व्यक्ती पाहिले. मात्र मला पाच वर्ष घरी बसवलं. मी कधीही वाईट केलं नाही, माझं काय चुकलं?, असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला आहे.

“दूध पोळलं म्हणून…”

अहिल्याबाई यांच्या नावाने मी सर्वात जास्त सभागृह दिलं. दूध पोळलं आहे. आता ताक देखील फुंकून पिलं पाहिजे. देशाला 75 वर्षात साधे शौचालय देखील मिळाले नव्हते. मात्र दहा वर्षात या सरकारने हे चित्र बदललं आहे. वर्षानुवर्ष नेत्यावर जनतेनी विश्वास ठेवला. आता आम्हालाही सक्षम नेता मिळाला आहे. त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी स्थानिकांना केलं आहे.