नेता म्हणजे कार्यकर्त्याचा जीव असतो… नेत्याचा जय- पराजय कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागतो. एखाद्या निवडणुकीत पराभव झाला तर नेत्या इतकंच त्याचा कार्यकर्ताही दुखावला जातो. अशावेळी खचलेल्या कार्यकर्त्याचं मनोबल वाढवलं गेलं नाही तर विपरित घटनांनाही सामोरं जावं लागू शकतं. अशीच घटना बीडमध्ये घडली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवांनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्याने पराभवामुळे तरूणाने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. यामुळे बीड परिसरात शोककळा पसरली आहे. पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या कार्यकर्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे.
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने तरूणाने जीवन संपवलं असल्याची चर्चा होतेय. लातूरमधील सचिन मुंडे या तरूणाने जीवन संपवलं. तरूणाने जीवन संपवल्याने परिसरात शोककळा परसरली आहे. पंकजा मुंडेंच्या पराभवाने सचिन खचला आणि त्याने जीवन संपवल्याचा दावा या तरूणाच्या कुटुंबाने हा दावा केला आहे. लातूर जिल्ह्यातील येस्तार गावातील ही घटना आहे.
लातूरमधली ही घटना समजताच पंकजा मुंडे यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा… संयम ठेवा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. 15 जूनपासून आभार दौरा करणार असल्याचंही पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे.
स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही …मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा..कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे … मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा!! ..अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात.. शांत व सकारात्मक रहा please please..
माझ्या साठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा… आई बापाला दुःख देऊ नका.. त्यांच्या जीवाला घोर लावू नका.. तुम्हाला शप्पथ आहे..मुंडे साहेबांची…
15 जूनपासून मी आभार दौरा करत आहे …तो पर्यंत सर्व जण प्रतिक्षा करा…
स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही …मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा..कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे … मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 9, 2024