राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मध्यरात्री अंतरवली सराटी गावात जात धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांची मुंडे यांच्या परळीत घोंगडी बैठक पार पडली. परळीतील ‘हलगे गार्डन’ या ठिकाणी घोंगडी बैठकीचे झाली. या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी एका मराठा बांधवाने आणलेल्या पोस्टरने लक्ष वेधलं आहे.
मनोज जरांगे यांची परळीत काल घोंगडी बैठक पार पडली. यावेळी जरांगे पाटील येण्याआधी याठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रर्माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित बांधवांनी रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. गाण्यावर ठरला मराठा बांधवांनी ठेका धरल्याचे दिसून आले. यावेळी एका वयोवृद्ध आजोबांनी या गाण्यावर नाचत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
मनोज जरांगे यांचं भाषण सुरू असताना एक बॅनरही झळकलेले दिसून आले. यामध्ये उपस्थित समाज बांधवांच्या हातात ‘हम किसीको नहीं डरते, लेकीन रात को चुपचाप मिलते’ अशा मजकूराचे बॅनर दिसून आलं. हा मजकूर धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंच्या घेतलेल्या भेटीला अनुसरून होता. या बॅनरची परळीसह बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.
मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक आज परळीत पार पडली. यावेळी जरांगे पाटील येण्याआधी याठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रर्माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित बांधवांनी रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. गाण्यावर ठरला मराठा बांधवांनी ठेका धरल्याचे दिसून आले. यावेळी एका वयोवृद्ध आजोबांनी या गाण्यावर नाचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाषण सुरू असताना एक बॅनरही झळकलेले दिसून आले. यामधे उपस्थित समाज बांधवांच्या हातात ‘हम किसीको नहीं डरते लेकीन रात को चुपचाप मिलते’ अशा मजकूराचे बॅनर दिसून आलेय. हा मजकूर धनंजय मुंडे यांना अनुसरून असल्याचं दिसून आले.