बीड : बीडमध्ये तहसिलदार (Tahsildar) आणि वाळू माफिया (Sand Mafia) वाद टोकाला पोहचला असून तहसिलदारांनी कारवाई केली म्हणून वाळू माफियांनी थेट तहसिलदारांचे घर गाठले. येथे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तहसिलदारांच्या घराच्या गेटवर लाथा मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार तहसिलदारांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वाळू माफियांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे खाडे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय चांगलेच दहशतीत आहेत. (Sand mafia attacks Tehsildar’s house in Beed)
बीडमधील गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी वाळू माफियांविरोधात कंबर कसली आहे. अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर खाडे यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने वाळू माफिया आणि तहसिलदारांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. याच वादातून आजचा प्रकार घडला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी वाळू माफियांनी खाडे यांच्याविरोधात विविध तीन तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार सचिन खाडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येवला तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून यावेळी लाकडी दांडक्याचा वापर मारामारी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. किरकोळ कारणावरून दोन गटात भांडणे झाली होती. भांडणे सोडविण्यास गेलेल्या काही जणांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने जखमी झाले आहेत. या किरकोळ भांडणाचे परिवर्तन दोन गटांच्या तुंबळ हाणामारी झाल्याने संदर्भात येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 8 जणांना अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहे.
लग्नाच्या एक दिवस अगोदर हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवारी घेऊन नाचणे लातूरच्या नवरदेवाला आणि त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. हातात तलवार आणि कोयते घेऊन नाचणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या मित्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातल्या पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. नवरदेव मात्र फरार झालाय. विवेकांनद चौक पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (Sand mafia attacks Tehsildar’s house in Beed)
इतर बातम्या
आयफोनसाठी 5 लाख घेऊन अल्पवयीन मुलगा मुंबईत दाखल, नांदेडमध्ये व्यापाऱ्याच्या घरी काय घडलं?
VIDEO | हळदीला मित्रांचा आग्रह, नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स, पोलीस येताच लग्नाच्या मुहूर्तावरच फरार