Dhananjay Munde : गणपत्तीची शपथ घेऊन सांगते, धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवणे…अंजली दमानिया यांचे मोठे वक्तव्य

| Updated on: Dec 29, 2024 | 12:48 PM

Anjali Damania on Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.

Dhananjay Munde : गणपत्तीची शपथ घेऊन सांगते, धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवणे...अंजली दमानिया यांचे मोठे वक्तव्य
अंजली दमानिया, धनंजय मुंडे
Follow us on

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी, गुंडगिरी, खंडणीचे प्रकार सर्वच एक एक बाहेर येत आहे. आमदार सुरेश धस यांनी तर अनेक गौप्यस्फोट केले आहे. सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पण या प्रकरणात उडी घेतली आहे. एकूणच धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा दावा आता सत्ताधारी गोटातून करण्यात येत असताना, दमानिया यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ते दोघेच गुन्हेगार आहेत असे नाही

अंजली दमानिया यांनी त्यांच्या आंदोलनाची रुपरेषा यावेळी सांगितली. त्या रोज सकाळी 10-12 या कालावधीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असतील. त्याठिकाणी लोक जी माहिती देतील, त्यातील तथ्य शोधून, त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोनच व्यक्तीविरोधात आंदोलन का करण्यात येत आहे, असा सवाल विचारण्यात येत आहे. हे दोघेच गुन्हेगार आहेत असं नाही. इतरही राजकारणी बीडचे तितकेच गुन्हेगार आहेत पण सगळ्यांविरुद्ध एकत्र करणं शक्य नाही म्हणून याची सुरुवात आम्ही धनंजय मुंडे आणि कराड याच्यापासून करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

सर्व एकाच माळेचे मणी

एडीआर नावाची एक संस्था आहे ज्यांनी तो रिपोर्ट बाहेर काढलाय की 118 लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे. तर असं जर असेल तर हे लोक मंत्री म्हणून तिथे जाणार आणि मंत्री म्हणून तिथे कायदे बनवणार आणि ते आपल्या जनतेवर लादणार हे मला मान्य नाही, असे दमानिया म्हणाल्या.

धनंजय मुंडे सारखे जे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थारा देणारी माणसं जे स्वतः अशी अनेक कृत्य केली आहे, अशा माणसाला तिथे राहणं हे योग्य नाही, म्हणून ही लढाई आहे. त्या मोर्चात मी सहभागी नाही झाले कारण तीन जे व्यक्ती होते. शरद पवारांनी सांगितलं होतं ते येणार आहेत त्यांना जितेंद्र आव्हाड आले होते, सुरेश धस होते आणि संदीप क्षीरसागर ही त्या मंचावर होती ही माणसं त्याच प्रवृत्तीची आहे, असा आरोप दमानिया यांनी केला.

गणपतीची शपथ…

कालच्या मोर्चात ही माणसं स्वतःचं पोळीवर राजकारणाची पोळी भाजून घ्यायला तिथे गेले होते. त्यांना संतोष देशमुखांची किंवा त्यांच्या परिवाराशी काही देणं घेणं नाहीये एकीकडे ते म्हणतील की राजकारण आम्ही बाहेर ठेवून हे करतोयपणे साफ चुकीचे आहे. कुठेतरी यांना स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे, असा घणाघात दमानिया यांनी केला.

गणपतीची शपथ घेऊन सांगते. गणपती हे माझे आराध्य आहेत, असे सांगत त्या म्हणाल्या की धनंजय मुंडेंचं एकट्याचा राजकारण संपवण्यासाठी हे आंदोलन आपण करत नाही. तर जिथं जिथं असं गुन्हेगारीकरण सुरू आहे. त्यासाठी एक उदाहरण घालून देण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे त्या म्हणाल्या. आता अनेक ठिकाणी धनंजय मुंडे तयार होत असल्याने, राजकीय गुन्हेगारीकरण होत असल्याने ते थांबवणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.