बीड : बीडमध्ये एका ऊसतोड मजूर महिलेचा खून करण्यात आला. तो खून तिच्या नवऱ्याने केला. घटनेचा पंचनामा झाला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. परंतु, महिलेच्या आई-वडिलांना काही निरोप नव्हता. पण, पाहुण्यांनी सांगितलं आणि ते धडकले. हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे आमच्या मुलीवर आम्ही अंत्यसंस्कार करू असा पावित्रा मृतक महिलेच्या माहेरच्या मंडळींनी घेतला. ते सरळ पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले.
मृतकाची आई म्हणाले, काय झालं त्यानं आम्हाला कळू दिलं नाही. काही सांगितलं नाही. पंचनामा झाल्याचं आम्हाला सांगितलं नाही. कोणत्याही प्रकारचा निरोप दिला नाही. पाहुण्यांकडून निरोप आला. माझं मुलीसोबत रविवारी संध्याकाळी बोलणं झालं.
मुलीसोबत बोलत असताना त्यानं मोबाईल हिसकून घेतलं. मग, त्याच्या आजोबाच्या मोबाईलवर फोन लावला. त्यांच्यासोबत एक-दोन शब्द बोलली. नातू कसे आहेत म्हणून विचारलं. त्यांनी भाकरी टाकत आहे, असं म्हणून ठेवून दिलं.
मुलीचा मृतदेह मिळावा, यासाठी तिच्या आईवडिलांकडून लोकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांची समजून घातली. पोलिसांचं काम काय मृतदेह उचलणे आणि रुग्णालयात घेऊन जाणे. पुढची प्रक्रिया करणे असं पोलीस नातेवाईकांना सांगत होते.
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील ऊसतोड मजूर सुनीता राठोड या महिलेचा पतीकडूनच खून झाला आहे. महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर सासरकडील लोकांनी मृतदेह न सांगताच घेऊन गेले. त्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला होता. मृतक महिलेचा मृतदेह मिळावा, यासाठी महिलेच्या माहेरकडील लोकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिया घातला.
मृतक महिलेचे माहेरचे नातेवाईक थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले. आमच्या मुलीच्या मृतदेहावर आम्हाला अंत्यसंस्कार करू द्या. आरोपींना अटक करून कारवाई करा. अशी माहिती त्यांनी केली. पोलीस त्यांची समजूत घालत होते. पण, ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.