बीड : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज बीडमध्ये खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर निशाणा साधला. बीड (Beed) येथील कार्यक्रमात बोलताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, कास्ट्यूम घालून एक गाण आमच्या नवनीत अक्कानी केलं आहे. पण, त्यांच्यावर चर्चा झाली नाही. मग, ज्या गाण्यात खान असते म्हणून चर्चा होते का. खान असतो म्हणून त्यावर आक्षेप होतात. तसाच भगव्या रंगाचा कास्ट्यूम घालून एक गाण नवनीत अक्कानं पण केलं. पण, नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. अस का, असा सवाल त्यांनी विचारला.
नवनीत अक्काच्या नावाच्या पुढे खान, शेख, तांबोळी, असं काही नाही म्हणून का. माफ करा, मी जरा जास्तचं स्पष्ट आहे. मी पोलिटीकली करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असलं पाहिजे. सोशली करेक्ट असणं मला फार महत्त्वाचं आहे. मी माझं म्हणणं ठामपणे मांडते, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
माध्यमांकडून नरेटिव्ह सेट करण्याची स्पर्धा चालते. नरेटिव्ह काय सेट केलं गेलं. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडलेच नाही. पण, त्या नरेटिव्हमध्ये खरचं काही तत्थ्य आहे का, यावर कुणीचं प्रश्न विचारत नाही. अडीच वर्षातील दोन वर्षे कोरोनात गेली. कोरोनाचा पहिला नियम हा होता की, संपर्क टाळायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा बीड दौरा होता. माजलगावमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होता. बैठकीला ठाकरे गटाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत आगामी निवडणुकावर चर्चा झाली. पक्ष मजबूत करण्याचे अंधारे यांचे आवाहन केले.
बीड जिल्ह्यात सुषमा अंधारे यांची पहिलीच बैठक होती. बीडमध्ये सुषमा अंधारे सक्रिय झाल्यात. त्यामुळं त्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आव्हान? देणार असल्याची चर्चा सुरू झाली. पदाधिकारी बैठकीला मोठी गर्दी होती.