क्षीरसागर यांना सत्तेचा माज आला, गोळीबार प्रकरणी विनायक मेटेंचा घणाघात

| Updated on: Feb 28, 2022 | 8:17 PM

बीडमधील गोळीबारात दोघे जण जखमी झाले होते. मात्र या वादात आता विनायक मेटेंनी (Vinayak Mete) उडी घेतली आहे. यावरून विनायक मेटेंनी क्षीरसागर कुटुंबियांवर जोरदार निशाणा साधला आहे.

क्षीरसागर यांना सत्तेचा माज आला, गोळीबार प्रकरणी विनायक मेटेंचा घणाघात
विनायक मेटेंकडून क्षीरसागर कुटुंबीय टार्गेट
Image Credit source: tv9
Follow us on

बीड : बीडच्या राजकारणात सध्या क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) कुटुंबियांचा चागलाच बोलबाला आहे. अलिकडच्या काळात क्षीरसागर कुटुंबियातील अंतर्गत संघर्षही अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. आमदार संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर (Yogesh Shirsagar) यांची डायलॉगबाजीही मागील काळात गाजली. मात्र दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये झालेल्या गोळीबाराने बीडचे राजकारणही हादरून गेले आहे. यावरून सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या प्रकरणी शिवसेना (Shiv Sena) नेत्या पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन खरेदी विक्रीच्या वादातून मुद्रांक विभाग कार्यालयाजवळ शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हा प्रकार घडला होता. बीडमधील गोळीबारात दोघे जण जखमी झाले होते. मात्र या वादात आता विनायक मेटेंनी (Vinayak Mete) उडी घेतली आहे. यावरून विनायक मेटेंनी क्षीरसागर कुटुंबियांवर जोरदार निशाणा साधला आहे.

क्षीरसागर कुटुंबावर गंभीर आरोप

शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी दोन दिवसापूर्वी बीडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी क्षीरसागर कुटुंबावर दहशत पसरविण्याचा आरोप केला आहे. क्षीरसागर यांना सत्तेची मस्ती आणि माज आला आहे, असं म्हणत जहरी टीका केली आहे. आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी क्षीरसागराच्या भाऊबंदकीमुळे बीड मधील कायदा-सुव्यवस्था ही वेशीवर टांगली गेली, असल्याचा आरोप केला आहे, तसेच क्षीरसागर कुटुंबात सुरू असलेल्या पुष्प आणि डॉनच्या गॅंगवार मुळे सर्वसामान्य बीडकरांच जगणं मुश्कील झाल्याचं मेटे म्हणाले आहेत.

जमीन सरकारने ताब्यात घ्यावी

यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि बीडचे पोलीस अधीक्षक यांच्याही कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. ज्या जमिनीच्या वादातून क्षीरसागर कुटुंबात वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण गोळीबारापर्यंत गेलं. ती जमीन देवस्थानची असून सरकारने आपल्या ताब्यात घ्यावी. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचही मेटे म्हणाले आहेत. त्यामुळे हा संघर्ष आणकी वाढण्याची शक्यता आहे. विनायक मेटे हे नेहमीच महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतात. मात्र या गोळीबारानंतर त्यांनी थेट क्षीरसागर कुटुंबियांना टार्गेट केले आहे. आता क्षीरसागर कुटुंबीयही मेटेंना जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचं दिलीप वळसे पाटील यांना पत्र, बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलावण्याची मागणी

stinger missile च्या जोरावर युक्रेन म्हणतोय “झुकेगा नहीं साला”,  कसं आहे रशियाचं कंबरडं मोडणारं मिसाईल?

राज्यपालांकडून छत्रपतींचा अपमान होताना भाजप गप्प का? कोश्यारींना केंद्राने परत बोलवावे-काँग्रेस