नागपूर : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच काँग्रेस नेते आशिष देशमुख (Congress leader Ashish Deshmukh) यांनी समृद्धी महामार्गावरून कार चालवली. नागपूरपासून 200 किमोमीटर आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास केला. तासी 170 च्या स्पीडने बीएमडब्ल्यू कार चालवली. आशिष देशमुख यांच्या समृद्धीवरील प्रवासाने वाद होण्याची शक्यता (likely to dispute) आहे.
यावेळी आशिष देशमुख म्हणाले, विदर्भातील लोकांना माझं आव्हान आहे की, या महामार्गाचा फायदा घ्यावा. विदर्भात औद्योगिकरण करा. विदर्भात बनविलेला माल हा जगात पोहचवा. मेड इन विदर्भाच्या माध्यमातून वस्तू जगापर्यंत पोहचवा. अतिशय चांगला असा हा रस्ता आहे. इथं दोनशेच्या वर स्पीडनी गाड्या चालू शकतात. सरकारनं अतिशय चांगल असं काम या समृद्धी महामार्गाचं केलंय. उद्घाटन झाल्यानंतर या महामार्गाच्या माध्यमातून घराघरापर्यंत समृद्धी आणा.
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूरपर्यंत कामं पूर्ण झालंय. बुलडाणा व वाशिम येथील काम सुरूय. मे अखेरपर्यंत समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला देशी झाडं राहणार आहेत. हिरवळीमुळं प्रवास सुखकर व नयनरम्य होणाराय. दोन मे रोजी हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. पण, तत्पूर्वीच या मार्गावरून गाडी चालवून आशिष देशमुख यांनी शिवसेनेचा रोष ओढवून घेतला.
समृद्धी महामार्गाचे काम नागपूर ते सेलुपर्यंत झालंय. राज्य सरकार दळणवळणाच्या सुविधा सुरू करण्यासाठी हा महामार्ग लवकरच सुरू करणाराय. पहिल्या टप्प्यात 210 किलोमीटरचा मार्ग सुरू केला जाणाराय. या हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते मुंबई असा 700 किलोमीटरचा प्रवास फक्त सहा ते सात तासांत पूर्ण होणाराय. स्मार्ट सिटीसाठी काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला विरोध केला.