कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या नाशिकमधील मराठा मूक आंदोलनानंतर खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chatati) यांनी सरकारला 21 दिवसांची मुदत दिलीय. संभाजी छत्रपती यांच्या या भूमिकेवर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. त्यानंतर त्यांनी परखड सवाल केला आहे. “माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत. मी मॅनेज होईल का ?” असे संभाजी छत्रपती यांनी मराठा संघटनांच्या समन्वयकांना विचारले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. (belongs to Chhatrapati family how I could be manage question asked by Sambhaji Chatati to Maratha Coordinator)
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. खासदार संभाजी छत्रपती आरक्षण तसेच मराठा समाजाच्या इतर मागण्यांचा पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी त्यांची राज्य सरकारसोबत चर्चासुद्धा सुरु आहे. यापूर्वी मराठा समाजाच्या मागण्या तसेच अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यभर मूक आंदोलन करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. नंतर नाशिकमधील मूक आंदोलनांतर त्यांनी राज्य सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी 21 दिवसांची मुदत दिली होती. तसेच आंदोलन काही काळासाठी स्थगित केले.
त्यांच्या याच भूमिकेवर मराठा समाजाचे काही नेते तसेच संघटना यांनी प्रश्वचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यानंतर संभाजी छत्रपती यांनी उत्तर दिले आहे. माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत. मी मॅनेज होईल असं वाटतं का असा सवाल संभाजी छत्रपती यांनी त्यांच्यावर शंका घेणाऱ्यांवर केला आहे.
आज कोल्हापुरात मराठा संघटनांच्या समन्वयकांशी झालेल्या बैठकीत संभाजी छत्रपती यांनी अनेक मुद्द्यांवरील आपली भूमिका स्पष्ट केली. सध्याची कोरोना स्थिती आणि राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची घेतलेली दखल यामुळे संभाजी छत्रपती यांनी राज्यातील मूक मोर्चांचे सत्र तूर्तास थांबवलेले आहे. मात्र, आंदोलन थांबवलेले असले तरी राज्यात ठिकठिकाणी बैठका सुरुच असतील असे त्यांनी यापूर्वी सांगितलेले आहे. यावर बोलताना “सरकार सोबत माझी काय चर्चा झाली; हे समाजाला कळणे गरजेचं आहे म्हणूनच आजची बैठक झाली. सरकारकडे कोणते पर्याय आहेत तेदेखील समाजाला आजच्या बैठकीत सांगितले. अशाच प्रकारची बैठक बीड आणि औरंगाबादमध्ये देखील घेणार आहे,” असे संभाजी छत्रपती म्हणाले.
तसेच यावेळी बोलताना त्यांनी सारथीविषयी भाष्य केलं. “सारथीचे उपकेंद्र फक्त कोल्हापूरसाठी नाही. येत्या काही दिवसांत सारथीचे उपकेंद्रे अन्य टिकाणी देखील होतील. माझा प्रयत्न फक्त कोल्हापूरसाठी नाही तर पूर्ण समाजासाठी असतो,” असं भाष्य संभाजी छत्रपती यांनी केलं.
इतर बातम्या :
आंदोलन करू नका हे सांगू शकत नाही, मात्र परिणामाचे भान राखणे गरजेचे, संभाजी छत्रपतींचं मोठं विधान
VIDEO: “मी भुजबळ यांच्या विरोधात नाही, कुणाला वाईट वाटले असेल तर माफी मागतो”
मी गोपीनाथ मुंडेंचा शिष्य, पंकजांना वडेट्टीवार म्हणतात, आपण गुरुबंधू, वाचा ओबीसी परिषदेत काय घडतंय?
(belongs to Chhatrapati family how I could be manage question asked by Sambhaji Chatati to Maratha Coordinator)