मुंबई : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डला (CM Uddhav Thackeray Bhandara Visit) शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत 17 नवजात बाळांपैकी 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी भंडाऱ्याच्या दौऱ्यावर आहेत (CM Uddhav Thackeray Bhandara Visit).
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 9, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 10.10 वाजता वर्षा बंगल्यावरुन भंडाराकडे रवाना झाले. दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांनी दुर्घटनाग्रस्त बेहरे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देतील.
भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देण्यासाठी तसेच मृत बालकांच्या पालकांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे भंडारा येथे रवाना.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 10, 2021
>> 10.10 वाजता मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान येथून सांताक्रूझ विमानतळाकडे रवाना
>> 11.00 वाजता विमानाने नागपूरकडे रवाना होतील
>> 12.15 वाजता मुख्यमंत्री नागपूर विमानतळावर पोहोचतील
>> 12.20 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शहापूरकडे निघतील
>> 12.40 वाजता ते मौजा शहापूरला पोहोचतील
>> 12.55 वाजता मुख्यमंत्री भंडारा येथे पोहोचून नवजात बालकं गमावलेल्या भोजापूर येथील पालकांची भेट घेतील
>> 1.20 वाजता मुख्यमंत्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचतील, तिथे ते पालकांची भेट घेतील आणि घटनास्थळाचं निरिक्षण करतील
भंडारा इथं सरकारी रुग्णालयात मध्यरात्री अग्नितांडव झालं. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागली. या आगीतून 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला.
CM Uddhav Thackeray Bhandara Visit
भंडारा दुर्घटनेच्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून डॉ. साधना तायडे यांना हटवले, नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची अध्यक्षपदी नियुक्ती
दुर्दैवाने ही घटना घडल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या, त्यातून एक धडा घेवून, पुन्हा एकही जीव अशा कारणामुळे जाऊ द्यायचा नाही, या निश्चियाने सरकार काम करेल
नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वात समिती बनविली आहे, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी त्यात असतील, राज्याच्या सर्व रुग्णालयाच्या फायर अॅण्ड सेफ्टी ऑडिटचे आदेश दिले आहे, जरी ऑडिट झाले असले तरी पुन्हा करायला लावू, थेट राज्याच्या आरोग्याच्या स्थितीवर जाऊ नका, आम्ही राज्याची जबाबदारी घेतली आहे
गेल्या वर्षभरापासून राज्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त आहे, कोरोना संदर्भात काम करताना आरोग्य यंत्रानेबद्दल काही दुर्लक्ष झाले आहे का हे अहवालात समोर येईल, कोणाला ही आरोपी करणार नाही, मात्र दोषींना सोडणार नाही
ही अतिशय भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे, जिथे ही घटना घडली त्या रुग्णालयाची मी आताच पाहणी केली, हे घडलं कशामुळे हे बघावं लागेल, आधी त्या विशिष्ट उपकरणाबाबत काही मागमी करण्यात आली होती का, कुठली तक्रार आली होती का?, हे पाहावं लागेल
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात मुलांच्या एसएनसीयु कक्षात लागलेल्या आगीत 10 नवजात मुलांचा होरपळुन मृत्यू झाला, या प्रकणाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे भंडारा जिल्हा सामान्य रुगणालयात पोहचले आहेत
गेलं वर्षभर कोरोनाचा सामना करताना इतर गोष्टींकडे डोळेझाक केली गेली का?, याची चौकशी करण्याचे आदेशमी काल दिले आहेत, संपूर्ण राज्यातील रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट हे लवकरात लवकर करण्याचे आदेश दिलेले आहेत, या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी एक टीम तयार केली आहे, त्यामध्ये विभागीय आयुक्तांना जबाबदारी देण्यात आली आहे, मुंबईतून अग्निशमन दलाचे प्रमुख राम दळे त्यांचीही नेमणुक या टीममध्ये करण्यात आली आहे, कुठेही कसर राहणार नाही, सत्या पुढे येईल आणि त्यात जर कुणी जबाबदार आढळून आलं तर त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही,
या घटनेनंतर एक चौकशी तर झालीच पाहिजे, यामध्ये हा अपघात अचानक घडला आहे, की अहवाल आल्यानंतरही दुर्लक्ष झालं आहे हेही तपासलं जाईल
आपण पाहिलं असेल की दुर्घटना आम्ही गांभीर्याने घेतली आहे, मी इथे आलो आहे, माझ्यासोबत इतरही मंत्री आहेत, जी दुर्घटना घडली त्यात नेमकं काय घडलं हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही, मी आज त्या कुटुंबीयांना भेटलो, हात जोडू उभं राहण्याशिवाय माझ्याकडे आणखी काहीही शब्द नव्हते कारण सांत्वन करता येईल असे कोणतेही शब्द माझ्याकडे नाहीत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेहरे कुटुंबीयांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांसोबत नाना पटोलेही उपस्थित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल, हेलिकॅप्टर ने होणार भंडाराकडे रवाना, भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात 10 बालकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार, त्यानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार
भंडारा जळीतकांडाप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, दहा बालकांचा गुदमरुन मृत्यू सरकारी अनास्थेचे बळी, भंडारा दुरघटनेत आम्ही राजकारण करणार नाही, मात्र, चौकशी करुन दोषीवर कारवाई झाली पाहीजे, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट
भंडारा भोजापूर गिता बेहरे कुटुंबीयांची आरोग्य तपासणी सुरु, भंडारा सामान्य रुग्णालयात त्यांच्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू, आज मुख्यमंत्री घेणार बेहरे परिवाराची भेट, मृतक चिमुकलीच्या वडीलांना पैसे नको, केली सरकारी नोकरीची मागणी