Bhandara Hospital Fire | भंडाऱ्याच्या आगीनेही ‘लक्ष्मी’लाच गाठलं, नवजात बळींमध्ये बालिकाच कशा सापडल्या?

| Updated on: Jan 09, 2021 | 1:22 PM

भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेत अधिकाधिक बालिकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे भंडाऱ्याच्या आगीनंही लक्ष्मीलाच गाठल्याचं दुर्दैवी मृत्यू पाहायला मिळत आहे

Bhandara Hospital Fire | भंडाऱ्याच्या आगीनेही लक्ष्मीलाच गाठलं, नवजात बळींमध्ये बालिकाच कशा सापडल्या?
Follow us on

भंडारा: जिल्हा शासकीय रुग्णालयात मध्यरात्री लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झालाय. तर 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. तर मृत बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत अधिकाधिक बालिकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे भंडाऱ्याच्या आगीनंही लक्ष्मीलाच गाठल्याचं पाहायला मिळत आहे.(More girls die in Bhandara district hospital fire)

हाती आलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये कोणत्या बालिकांचा मृत्यू झालाय पाहूया.

१) वंदना मोहन शेडाम, रावनवाडी, भंडारा

– सात दिवसांच्या मुलीचा मृत्यू

२) योगीता विकेष धुळसे, श्रीनगर भंडारा

– एक दिवसाच्या मुलीचा मृत्यू

३) प्रियंका जयंती बसूशंकर, जाम भंडारा

– एक महिन्याच्या मुलीचा मृत्यू

४) कविता बारेलाल कुमरे, लेंडेझरी खापा भंडारा

–  तीन दिवसांच्या मुलीचा मृत्यू

५) सुकेशनी धर्मपाल आगरे, उसरला, भंडारा

-१२ दिवसांच्या मुलीचा मृत्यू

६) दुर्गा विशाल रहांगडाले, डाकला

-10 दिवसांच्या मुलीचा मृत्यू

७) गिता विश्वनाथ बैरे, गोजापूर, भंडारा

-२ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

८) हिरकन्या हिरालाल भानारकर, उजगाव साकेली

– 7 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलं. दरम्यान, 10 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. तर 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे.

सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे निर्देश

भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बाळांच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, आता राज्यातील सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या:

Bhandara Hospital Fire | “माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्या”, बाळांच्या आई आणि नातेवाईकांची आर्त हाक

Bhandara Hospital Fire | भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

More girls die in Bhandara district hospital fire