चंद्रपूर : तांदूळ नगरी म्हणून नाव लौकिक आलेल्या गोंदिया-भंडारा (Gondia bhandara) जिल्ह्यात धान्य घोटाळ्यात गेल्या तीन महिन्यात चार जिल्हा पणन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तरी सुध्दा धान्य घोटाळा थांबताना दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा प्रकार उजेडात आल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. गोंदिया जिल्ह्यातील धान्य चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्याकडे जात असताना भंडारा पोलिसांनी (bhandara police) कारवाई करीत 8 लाखांच्या धानासह दोन ट्रॅक ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आरोपींवरती कडक कारवाई करण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील दी पांडव सहकारी विपणन भात गिरणी अंतर्गत सुरु असलेल्या शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राने खरेदी केलेल्या काही धान्याची भरडाई करण्याचे आदेश गोंदिया जिल्हा पणन कार्यालयातून चंद्रपूर जिल्ह्याच्या मुलं तालुक्यातील हिमालया एग्रो फूड इंडस्ट्री यांना देण्यात आले होते. यासाठी जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी उचल डियो देखील हिमालया एग्रोला दिला असता हिमालया एग्रोने दि पांडव सहकारी विपणन भात गिरणी अंतर्गत सुरु असलेल्या नवेझरी गावातील शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रातून १४ मे २०२३ ला ( म्हणजेच काल ) दोन ट्रक धानाची उचल केली. जवळपास ४० किलो वजनाच्या धानाचे १४०० कट्टे देण्यात आले.
यासाठी हिमालया एग्रो इंडस्ट्रीला मुल यांना गोंदिया जिल्हा पणन कार्यलयातून प्रति क्विंटल 200 रुपये दराप्रमाणे अंदाजे 560 क्विंटल धान्याच्या भरडाईसाठी 1 लक्ष 12 हजार रुपये इतका वाहतूक भाडं देण्यात आलं आहे. मात्र हिमालया एग्रो इंडस्ट्री मूल यांनी स्वतःच फायदा साधून घेण्यासाठी शासकीय धान्य भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर पोलिश स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिखली जवळील श्री साई नाथ एग्री इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड याना खोटे बिल तयार करून धान्यांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. दरम्यान पोलीसांनी दोन्ही ट्रक पोलिस ठाण्यात जमा केले असून या संदर्भात चौकशी सुरु आहे.