भंडारा : सासुरवाळीत आलेल्या जावयाने घराशेजारील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी (Mohadi) तालुक्यातील पांढराबोडी (Pandharabodi) येथे घडली. गौतम लोणारे असे रेल्वेत लोकोपायलट (Locopilot) असलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरूद्ध आंधळगाव पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड महिना लोटूनही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळं पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पिढीताच्या वडिलाने संशय व्यक्त केला. आरोपी गौतम लोणारे हा वायगाव येथील नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी येथील त्याची सासुरवाडी आहे. दरम्यान, सासुरवाडीला आलेल्या गौतम लोणारे याने सासऱ्याच्या घराजवळ असलेल्या एका अल्पयीन मुलींवर 21 एप्रिलला अत्याचार केला. याची वाच्यता कुठे केली तर जिवे मारण्याची धमकी सुध्दा दिली. पण पीडित मुलीने घडलेला प्रसंग आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर आंधळगाव ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
सासुरवाळीत आलेल्या जावयाने घराशेजारील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आरोपी विरुध्द आंधळगाव पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पण, दीड महिना लोटूनही आरोपीला अटक नाही. पोलिसांनी आर्थिक व्यवहार केलाचा पीडित कुटुंबाचा आरोप आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत फरार आरोपीचा शोध घेत आहे. आरोपने सेशन्स कोर्टात जामीन मागितला होता. मात्र जामीन रिजेक्ट केला. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत. आम्हाला आमच्या पदाची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करीत नाही आहोत, असं सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मठामी यांचं म्हणणंय.
पण, आता या प्रकरणाला दीड महिना लोटला. आरोपी मिळाला नसल्याने पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांवरच संशय व्यक्त केला आहे. आरोपी रेल्वेत लोको पायलट असल्यानं धनाढ्य आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार झाला असल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली नसल्याचा पीडित मुलीच्या वडिलांचा आरोप आहे.