मतिमंद मुलीला मारहाण, रॉकेल ओतून पेटविण्याची धमकी, न्यायालयानं ठोठावली ही शिक्षा

| Updated on: Nov 20, 2022 | 4:04 PM

बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

मतिमंद मुलीला मारहाण, रॉकेल ओतून पेटविण्याची धमकी, न्यायालयानं ठोठावली ही शिक्षा
धक्कादायक...
Follow us on

भंडारा – घरी एकट्या असलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलीला मारहाण करण्यात आली. त्यानंतर रॉकेल ओतून पेटविण्याची धमकी देण्यात आली. या आरोपी तरुणाला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. नानेश्वर विठोबा राऊत (वय 35) रा. मोहरणा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे 27 मे 2017 रोजी घडली होती.

अल्पवयीन मतिमंद मुलगी घरी एकटी घरी होती. तिची आई शेतातून घरी आली. तेव्हा मुलगी जोरजोराने रडत असल्याचे दिसून आले. तिला विचारले असता नानेश्वर राऊत याने घरात प्रवेश करून मुलीला मारहाण केली होती. तसेच तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याची धमकी दिल्याचे पीडित मुलीनं सांगितलं.

नानेश्वरनं मंतिमंद मुलीला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही आपबिती मुलीनं आई घरी आल्यानंतर सांगितली. तिच्या आईनं पोलीस ठाणे गाठले.

लाखांदूर पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. पोलिसांनी 354 अ (2) 451, 323 सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी गांभीर्यानं घेतला. नानेश्वर राऊत याला अटक केली.

साक्षीपुरावे गोळा करून आरोपपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. अतिरिक्त व सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे यांनी साक्षी पुरावा तपासला. याअंती आरोप सिद्ध झाले. नानेश्वर राऊत याला पाच वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पाच वर्षानंतर का असेलना पीडित मुलीला न्याय मिळाला आहे.