भंडारा : बालविवाहास (Child Marriage) बंदी आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. हाच गुन्हा होत असल्याच्या संशयातून बाल संरक्षण समिती सतर्क झाली आहे. भर मांडवातून लग्नाचा डाव उधळण्यात आला. घटना भंडारा जिल्ह्यातली (Bhandara Crime News) आहे. यावेळी मांडवात वाजत गाजत वऱ्हाडींना घेऊन आलेल्या नवरदेवाला आल्या पावली परतावं लागलंय. लग्नाची सर्व तयारी झालेली होती. पण नवरीचं वय होतं, 17 वर्ष 19 दिवस! 18 वर्ष पूर्ण नसलेल्या या मुलीच्या लग्नाचा घाट घातला जात होता. भंडारातील साई मंगल कार्यालयात (Sai Mangal Hall, Bhandara) हा विवाह सोहळा पार पडणार होता. ही माहिती बाल संरक्षण समितीला समजली. त्यानंतर या समितीनं तीन पथकं तयार करत लग्नाचा हा डाव उधळला. मुलगी अल्पवयीन नाही, असा दावा तिच्या कुटुंबीयांकडून केला जात होता. मात्र तसा पुरावा मात्र देता न आल्यानं अखेर हे लग्न कार्य थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. एखाद्या सिनेमासारखाच प्रकार यावेळी साई मंगल कार्यालयात यावेळी पाहायला मिळाला.
वाजतगाजत नवरदेव लग्नमंडपात पोहोचला.लग्नाची घटिकाही अगदी जवळ आली. सर्व तयारी झाली असताना अचानक जिल्हा बाल संरक्षण समितीचे पथक पोलिसांसह लग्नमंडपात पोहोचले. नवरी मुलगी अल्पवयीन असल्याचा दावा समितीनं केला. तसे पुरावे दिले. अखेर हा लग्नाचा डाव मोडला. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
भंडारा येथील साई मंगल कार्यालयात बुधवारी लग्नसोहळा आयोजित केला होता. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महिला बालविकास विभागाला नवरी मुलगी अल्पवयीन असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यावरून भंडारा बालसंरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली. एक पथक साई मंगल कार्यालयात पोहोचले. तेथील हालचालींवर लक्ष ठेवून होते. दुसरे पथक मुलीने शिक्षण घेतलेल्या शाळेत जन्मतारखेची खातरजमा करण्यासाठी पाठविण्यात आले. तर तिसरे पथक भंडारा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचे पथक घेऊन आले.
सकाळच्या सुमारास वाजतगाजत नवरदेव आणि वधू मंडपी पोहोचला. लग्न लागण्याची तयारी सुरू झाली. परंतु जन्मतारखेचा दाखला मिळण्यास विलंब होत आल्याने कारवाई करता येत नव्हती. शेवटी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवरीचे आई-वडील व नातेवाइकांची भेट घेत त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. परंतु त्यांनी मुलीची जन्मतारीख 15 एप्रिल 2004 असल्याचे सांगत मुलगी 18 वर्षांची आहे, असे ठणकावून सांगितलं. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन कुमार साठवणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
शाळेचा दाखला देण्यास विलंब होत असल्याने पथकाने भंडारा नगर परिषद गाठून मुलीच्या जन्माचा दाखला प्राप्त केला. त्यावर 15 एप्रिल 2005 असे नमूद होते. नवरी मुलगी 17 वर्षे 19 दिवसांची असल्याची आढळून आली आणि लग्नाचा डाव मोडला।अखेर नवरदेव नवरीला बाल कल्याण समितिपुढे हजर करण्यात आले असून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करण्याचे लेखी उत्तर दिले आहे।मात्र लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्यां आपला हिरमोड करत वऱ्हाडींना आल्या पावली परत जावे लागले आहे.