भंडारा : भंडारा (BHANDHARA) जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील (MOHADI) ताडगाव ते धोपदरम्यान धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला काल रात्री मोठ्या प्रयत्नांची शिकस्त करून वनविभागाच्या विशेष पथकाद्वारे जेरबंद करण्यात आले. यासाठी नागझिरा (गोंदिया)(GONDIA) येथील शार्पशुटर यांना पाचारण करण्यात आले होते. वनविभागाच्या (FOREST DEPARTMENT) व पोलीस विभागाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री 8 वाजताच्या वाघाला बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे काल दुपारी वनविभागाच्या वन्यजीव बचाव पथकातील मदन हिरापुरे नामक वनमजुरावर वाघाने हल्ला करून जखमी केले तर रेस्क्यू टीमला सुद्धा चवताळलेल्या वाघाचा सामना करावा लागला. मात्र अखेर उशिरा त्याला जेरबंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मोहाडी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वाघ हजेरी लावत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांत दहशत व भीतीचे वातावरण पसरले आहे.
भंडारा जिल्ह्यात मागच्या काही दिवसात वाघांचे दिवसादर्शन होत असल्यामुळे शेतकरी आणि शेतात काम करणारे मजूर भयभीत झाले आहेत. वाघ पाळीव प्राण्यांवरती हल्ला करायचा. त्याचबरोबर शेतकऱ्यांवर सुध्दा हल्ला करीत होता. त्यामुळे वाघाला तात्काळ ताब्यात घ्यावे अशी विनंती गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती.
मागच्या कित्येक दिवसांपासून वनविभागाचं पथक वाघाच्या मागावर होतं. परंतु काल वाघाने दुपारी हल्ला केल्यानंतर वाघाचा नेमका ठावठिकाणा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लागला. त्यानंतर शार्पशुटरने त्याच्या कौशल्याने वाघाला जेरबंद केले. त्यामुळे काल तिथल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केलं आहे.
महाराष्ट्रात सुध्दा वाघांचे प्रमाण अधिक वाढले आहे. रोज वाघांचे दर्शन झाल्याच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांवरती वाघाने हल्ला केल्याच्या घटना उघडीस येत आहेत.