भंडारा : जितेंद्र आव्हाड यांना काल अटक झाली. आज त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही कायदेशीर पोलिसांची कारवाई आहे. राजकीय हस्तक्षेप कुणी काही केलेलं नाही. जे काही आहे ते नियमानुसार होईल. नियमाच्या बाहेर काही करणार नाही. सुडभावनेनं किंवा आकसापोटी आमचं सरकार काही काम करत नाही, असंही त्यांनी सांगितलं. भंडारा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गोसेखुर्दमधील जलपर्यटन 13 तालुक्यांना वरदान ठरेल. भंडारा जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळेल. या भागात आमुलाग्र क्रांती घडेल. जलपर्यटनाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
गोसेखुर्द जलपर्यटन 100 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. विस्तीर्ण असा हा जलसागर आहे. वॉटर स्पोर्ट्स सुरू होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं जलपर्यटन विकसित होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, खासदार सुनील मेंढे उपस्थित होते.
गोसेखुर्द प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पाच जिल्ह्यांचा याचा फायदा होणार आहे. अथांग असा हा समुद्र वाटतो. बोटिंग, पॅरासिलिंग पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले, गोसेखुर्दमलुं 750 गावं ओलिताखाली येणार आहेत. अडीच लाख हेक्टर जमीन सिंचनासाठी येणार आहे. 50 किमीचा हा जलपर्यटन असणार आहे. यामुळं पूर्व विदर्भात क्रांती घडेल. या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल.
थांबलेले प्रकल्पांना चालना देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं. एमसीडीसीच्या जोशी यांनी सादरीकरण केलं. विदेशी पर्यटक येऊ शकतात, असं पोटेन्शियल आहे. सर्वांशी चर्चा करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. केंद्रानं राज्यातल्या प्रकल्पांना प्राधान्य दिलंय. 2 लाख कोटी रुपये प्रकल्पांसाठी देण्यात येणार आहेत. केंद्रानं 4 हजार 31 कोटी दिले आहेत, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.